शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नोकरदार पुरुषांना मोठा दिलासा, आता ३ महिने घेता येणार पितृत्व रजा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2023 4:24 PM

1 / 6
तुम्हीही नोकरी करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण आता आई होण्यासोबतच वडील झाल्यानंतरही तुम्हाला प्रसूती रजेप्रमाणेच पितृत्व रजा मिळणार आहे. कदाचित तुम्हाला या बातमीवर विश्वास बसणार नाही पण हे वृत्त १०० टक्के खरं आहे.
2 / 6
आतापर्यंत तुम्ही फक्त सरकारी किंवा खाजगी कंपन्यांकडून महिला कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रसूती रजेबद्दलच ऐकलं असेल. ही रजा २६ आठवडे म्हणजे सुमारे ६ महिन्यांसाठी असते. पण, आता पिता बनणाऱ्या पुरुषांनाही तीन महिन्यांची रजा मिळणार असून ती पितृत्व रजेच्या श्रेणीत ठेवण्यात आली आहे.
3 / 6
वृत्तानुसार, भारतातील काही कंपन्यांसह, फायझर इंडियाच्या धर्तीवर पुरुष कर्मचार्‍यांना पिता बनल्यानंतर १२ आठवड्यांची पितृत्व रजा देणार आहे. कंपनीने आपल्या पॉलिसीमध्ये म्हटले आहे की, वडील झाल्यानंतर कर्मचारी २ वर्षांच्या आत या सुट्ट्यांचा वापर करू शकतात. जर कोणी पितृत्व रजा घेत असेल तर त्याला एका वेळी किमान दोन आठवड्यांपासून जास्तीत जास्त ६ आठवड्यांची रजा मिळू शकते.
4 / 6
क्युअर फिट - ६ महिन्यांची सुट्टी, जेपी मॉर्गन - १६ आठवडे, फायझर - १२ आठवडे, नेट वेस्ट - १२ ते १६ आठवडे, एक्सेंचर - १२ ते १६ आठवडे
5 / 6
कंपनीच्या या पॉलिसीमध्ये जे कर्मचारी पिता बनतील त्यांना २ वर्षांच्या आत या सुट्ट्यांचा लाभ घेता येईल. पितृत्व रजा घेणार्‍यांना एकावेळी किमान दोन आठवडे आणि कमाल सहा आठवड्यांची रजा घेण्याची सुविधा आहे. इतर कोणत्याही गुंतागुंतीच्या बाबतीत, कर्मचारी कंपनीच्या रजा पॉलिसीमध्ये समाविष्ट असलेल्या इतर सुट्ट्या देखील घेऊ शकतील ज्यात कॅज्युअल लीव, इलेक्टीव लीव आणि वेलनेस लीव यांचा समावेश आहे.
6 / 6
केवळ बायोलॉजिकल पालक बनण्यावरच नाही तर तुम्ही मूल दत्तक घेतल्यास तुम्हाला पितृत्व रजा देखील मिळू शकते. हे सामान्य मातृत्व आणि पितृत्व रजेप्रमाणेच मूल दत्तक घेतलेल्या पालकांनाही नियम लागू होतील.
टॅग्स :Parenting Tipsपालकत्व