शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पठाणकोट दहशतवादी हल्ला

By admin | Published: January 03, 2016 12:00 AM

1 / 10
मुंबई एटीएसला रेल्वेत बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमकीनंतर प्रवाशांच्या बॅगा सामान तपासास जवानांनी सुरवात झाली. (फोटो : सुशील कदम)
2 / 10
पठाणकोट येथील हवाई तळावर झालेल्या हल्ल्यानंतर मुंबईत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली. पठाणकोटच्या हल्ल्यानंतर देशभरात सतर्कतेचे आदेश देण्यात आले. छ. शिवाजी टर्मिनसवर प्रवाशांची तसेच रेल्वेगाड्यांमध्ये जाऊनही रक्षकांनी तपासणी केली.
3 / 10
पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावरील चकमक अजूनही संपलेली नाही. दबा धरुन बसलेल्या अतिरेक्यांपैकी काही जणांना ठार मारण्यात आले संपुर्ण देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे
4 / 10
दहशतवाद्यांनी हल्ला करताच त्यांना चोख प्रत्युत्तर मिळाले. यामुळे हवाई तळावर घुसण्याच्या इराद्याने हवाई तळाच्या पाठीमागे असलेल्या जंगलातून आलेल्या दहशतवाद्यांना तळाच्या बाहेरच्या भागात असलेल्या लंगरपर्यंतच पोचता आले
5 / 10
पहाटेच गोळीबाराचे आवाज सुरू झाल्याने आणि काही वेळातच हेलिकॉप्टर्सची घरघर सुरू झाल्याने येथील नागरिकांमध्ये काही काळ घबराट पसरली होती. मात्र दहशतवाद्यांना मारल्याचे वृत्त कळताच त्यांची भीती गेली.
6 / 10
रविवारी सकाळी शोधमोहिम सुरु झाल्यानंतर दबा धरुन बसलेले दोन अतिरेकी समोर आले. अतिरेक्यांचा नेमका आकडा अजूनही स्पष्ट झालेला नाही. मृत अतिरेक्यांकडे एके-४७ रायफल ग्रेनेड लॉंचर आणि जीपीएस डिवाईस सापडले आहेत.
7 / 10
शनिवारी (२जाने) पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकिस्तानातून आलेल्या सशस्त्र दहशतवाद्यांनी पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर हल्ला चढवला तेव्हापासून चकमक सुरु आहे. शनिवारी भारतीय सुरक्षा पथकांनी पाच अतिरेक्यांना कंठस्नान घातले होते. त्यामुळे चकमक संपली असे वाटले होते.
8 / 10
आज (रविवार३ जाने) सकाळी शोधमोहिमे दरम्यान अतिरेक्यांनी परेलेली आईडी स्फोटके निष्क्रीय करताना झालेल्या स्फोटामध्ये एनएसजीचे लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार शहीद झाले तर तीन जवान जखमी झाले.
9 / 10
शनिवारी (२जाने) पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकिस्तानातून आलेल्या सशस्त्र दहशतवाद्यांनी पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर हल्ला चढवला तेव्हापासून चकमक सुरु आहे. शनिवारी भारतीय सुरक्षा पथकांनी पाच अतिरेक्यांना कंठस्नान घातले होते. त्यामुळे चकमक संपली असे वाटले होते.
10 / 10
पंजाबमधील पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला हल्ला भारताने उधळून लावला. सुरक्षा जवानांनी जोरदार प्रतिहल्ला करत दहशतवाद्यांना कंठस्नान घातले