शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१० सेमी लांब, २.५ सेमी रुंद, लष्कराकडे आहे मुठीएवढं हेलिकॉप्टर, शत्रूच्या गोटात घुसून करतं असं काम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 3:09 PM

1 / 7
तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ड्रोन पाहिले असतील. त्यातील बहुतांश ड्रोन हे चित्रिकरणासाठी वापरले जातात. काही ड्रोन मात्र वैशिष्ट्यपूर्ण आहेत, तसेच ते सर्वसामान्यांना मिळत नाहीत. भारतीय लष्करही पॉकेट साइज ड्रोनचा वापर करते. हे ड्रोन अगदी सहजपणे शत्रूच्या गोटात शिरतं. तसेच त्यांच्या प्रत्येक हालचालीवरही बारीक लक्ष ठेवून त्याचे व्हिडीओ भारतीय लष्कराकडे पाठवते.
2 / 7
हा ड्रोन एवढा लहान आहे की, त्याचा आकार मुठीएवढाच आहे. हा ड्रोन इतर ड्रोनपेक्षा का वेगळा आहे, त्यामागची खास कारणं आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
3 / 7
आम्ही ज्या ड्रोनबाबत बोलत आहोत. तो एक पॉकेट साइज हेलिकॉप्टर आहे. त्याचं नाव PD-100 Black Hornet असं आहे. हा हेलिकॉप्टर ड्रोन दिसायला खूप लहान आहे. मात्र जेव्हा कामाची गोष्ट येते तेव्हा तो आपलं काम चोखपणे बजावतो.
4 / 7
या हेलिकॉप्टरद्वारे टेहळणीचं काम केलं जातं. जिथे माणूस सहजासहजी पोहोचू शकत नाही, अशा भागात या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून टेहळणी केली जाते. प्रतिकूल हवामान असलेल्या ठिकाणीही हा ड्रोन उत्तम पद्धतीने काम करतो. मात्र हा ड्रोन केवळ लष्करी वापरासाठी आहे.
5 / 7
PD-100 Black Hornet ड्रोन अत्यंत संवेदनशील परिसरामध्ये टेहळणीसोबत गुप्त मोहिमांमध्येही वापरता येऊ शकतो. अनेक देशांच्या सैन्यदलांकडून याचा वापर केला जातो.
6 / 7
हे ड्रोन रिमोटच्या सहाय्याने नियंत्रित करता येते. रिमोटमध्ये एक डिस्प्ले असतो. त्यामाध्यमातून याचं नियंत्रण करणारी व्यक्ती थेट प्रक्षेपण पाहू शकते. संकटकाळामध्ये बचाव मोहिमांदरम्यानही याचा वापक करता येऊ शकतो.
7 / 7
या ड्रोनची निर्मिती नॉर्वेमधील Prox Dynamics या कंपनीने केली आहे. तसेच हे हेलिकॉप्टर ड्रोन १० सेमी लांब आणि २.५ सेमी रुंद आहे. साधारण मुठभर आकाराचे आहे. हे ड्रोन २० मिनिटांपर्यंत उडवता येते. त्यामध्ये तीन कॅमेरे लावलेले असून याची किंमत १ कोटी रुपयांच्या आसपास आहे.
टॅग्स :Indian Armyभारतीय जवानDefenceसंरक्षण विभागtechnologyतंत्रज्ञान