शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शहीद कॅप्टनची पत्नी इन्स्टाग्रामवर बनवतेय Reels? समोर आलं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 3:11 PM

1 / 9
शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांची पत्नी स्मृती सिंह यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कीर्ती चक्र देण्यात आले होते. त्यानंतर स्मृती यांच्यावर सासू सासऱ्यांनी गंभीर आरोप केले.
2 / 9
कॅप्टन अंशुमन हे सियाचीनमध्ये आपल्या सोबत्यांचे प्राण वाचवताना शहीद झाले आणि त्यांना नुकतेच मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान करण्यात आले होते. यादरम्यान त्यांच्या पत्नीचे भावनिक फोटो इंटरनेटवर चांगलेच व्हायरल झाले होते.
3 / 9
कीर्ती चक्र मिळाल्याच्या काही दिवसांनंतर, अंशुमन यांच्या पालकांनी त्यांच्या सुनेवर कीर्ती चक्रासह सर्व सामान घेऊन माहेरी जाण्याचा आरोप केला. आपल्या सुनेच्या वागण्याबद्दलही त्यांनी निराशा व्यक्त केली होती.
4 / 9
या प्रकारानंतर लोकांनी स्मृती सिंह यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली. अनेकांनी त्यांचे हे पाऊल योग्य मानले, तर अनेकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली.
5 / 9
लोकांनी स्मृती सिंह यांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्यावर टीका केली होती. मात्र नेटकरी ज्या महिलेचे फोटो पोस्ट करुन आपला रोष व्यक्त करत होते त्या स्मृती सिंह नव्हत्याच.
6 / 9
स्मृती सिंह यांच्या फोटोऐवजी केरळच्या सिद्ध फॅशन एन्फ्लुएन्सर रेश्मा सेबॅस्टियनचा फोटो शेअर करून अनेकांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आणि तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
7 / 9
महत्त्वाचे म्हणजे रेश्मा सेबॅस्टियनची हेअरस्टाईल स्मृती सिंहसारखी आहे आणि दोघांचे काही फोटो सारखेच दिसत आहेत. यामुळे स्मृती सिंहऐवजी ट्रोलर्सनी रेश्माचे फोटो शेअर करण्यास सुरुवात केली.
8 / 9
यानंतर खुद्द रेश्मानेच याबाबत स्पष्टीकरण दिलं. मी शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांची पत्नी नाही. टीका करण्यालाही काही मर्यादा असते. आधी व्यवस्थित माहिती घ्या. मी याप्रकरणी पोलिसांत तक्रार करणार आहे, असा इशारा रेश्माने दिला.
9 / 9
रेश्मा व्यवसायाने इंजिनियर आणि मॉडेल देखील आहे. ती पती आणि मुलीसोबत जर्मनीत राहते. इंस्टाग्रामवर रेश्माचे ३.५० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
टॅग्स :Indian Armyभारतीय जवानViral Photosव्हायरल फोटोज्Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया