Photos: Chomoliti NDRF and ITBP jawans land in mud, search operation continues
Photos: चोमोलीत NDRF आणि ITBP जवान उतरले चिखलात, कामगारांचा शोध सुरुच By महेश गलांडे | Published: February 08, 2021 9:37 AM1 / 10 उत्तराखंडमधील चमोली येथे हिमकडा कोसळून आलेल्या भीषण जलप्रलयामध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. या जलप्रलयादरम्यान, दुर्घटनास्थळी अनेक लोक अडकले आहेत. त्यांना वाचवण्याचे काम सुरू आहे.2 / 10 उत्तराखंडमधील महापुरात आत्तापर्यंत 14 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, अद्यापही येथील भोगद्यात कामगार अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचं काम एनडीआरएफ जवानांकडून होत आहे. 3 / 10एनडीआरएफ आणि वायुसेनाच्या जवानांनी श्वान पथकासह भोगद्यात रात्रीपासून शोधमोहिम सुरु ठेवली, अद्यापही ही शोधमोहीम सुरुच आहे.4 / 10आयटीबीपीच्या जवानांनी 16 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढले, त्यानंतर दुसऱ्या सुरुंगातही 30 जण अडकल्याची माहिती मिळाली. त्यामुळे, रात्री उशिरापर्यंत या सर्वांचा शोध घेण्यात येत होता. 5 / 10भोगद्याजवळ मातीची जमीन दिसून आली, त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात चिखल झाला होता. या चिखलातून माणसं शोधताना मोठी कसरत करावी लागत आहे6 / 10एनडीआरएफ जवान आणि आयबीटीपीचे जवान चिखलात उतरुन अडकलेल्या कामगारांचा शोध घेत आहेत, जवळपास 30 फूट खोलपर्यंत परिसरात चिखल आहे.7 / 10उत्तराखंडमधील प्रलयानंतर वायू सैन्याने हवाई पाहणी दौरा करुन परिस्थितीचा आढावा घेतला, त्यानंतर सैन्य दलाला बोगद्यात उतरविण्यात आले. 8 / 1056 मरीन कमांडो बचाव कार्यासाठी तयार असून मुंबईत 16 आणि दिल्लीत 40 जवान मोहिमेसाठी सज्ज आहेत 9 / 10जखमींना बोगद्यातून बाहेर काढताच, रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. 10 / 10सैन्याचे 400 जवान जोशीमठ आणि ओली येथे पूर्ण तयारीनिशी उतरले आहेत. तसेच, आणखी 200 स्टँडबॉय म्हणून तैनात आहेत. आज दिवसभर ही शोधमोहिम सुरुच राहणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications