Photos Home minister Amit Shahs West Bengal visit targets Mamata Banerjee
शरणार्थींच्या घरी भोजन अन् ममतांवर निशाणा; असा सुरू आहे अमित शाहंचा धडाकेबाज बंगाल दौरा, पाहा PHOTO By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 18, 2021 6:54 PM1 / 15केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर आहेत. येथे त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर (Mamata Banerjee) देवी पूजेसह अनेक मुद्द्यांवर निशाणा साधला. शाह यांनी कोलकात्याजवळील दक्षीण 24 परगना जिल्ह्यात (South 24 Parganas) रॅली केली. (सर्व फोटो - ANI/Twiter)2 / 15पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या काही महिने आधीच भाजप बंगालमध्ये सक्रिय झाला आहे. गृहमंत्री शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, हे बंगालमध्ये सातत्याने दौरे करत आहेत.3 / 15दक्षिण 24 परगना येथे पोहोचलेल्या अमित शाह यांनी कैलाश विजयवर्गीय, मुकुल रॉय आणि दिलीप घोष यांच्यासोबत बांग्लादेशातून स्थलांतरित झालेल्या कुटुंबीयांच्या घरी भोजन केले. 4 / 15 अमित शाह यांनी आपल्या या दौऱ्यात राज्यातील वादळं आणि आपत्तीच्या मुद्द्यावरही भाष्य केले. गृहमंत्री म्हणाले, राज्यात भाजपचे सरकार आले, तर अम्फान रिलीफ फंडात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी केली जाईल. एवढेच नाही, तर राज्यात चक्रीवादळ आणि नैसर्गिक आपत्तीपासून बचावासाठी एक टास्क फोर्सदेखील तयार केला जाईल. 5 / 15सभे दरम्यान शाह म्हणाले, बंगालमध्ये दुर्गा पूजा व्हायला नको? यासाठी न्यायालयाच्या परवानगीची आवश्यकता लागते. सरस्वती पूजा व्हायला नको? त्यांनी या पूजा बंद केल्या. 6 / 15केवळ भाजपच्या दबावानंतरच त्यांना सरस्वती देवीची पूजा करताना बघितले गेले. मात्र, दीदी संपूर्ण बंगालला माहीत आहे, की आपणच शाळांमध्ये सरस्वती पूजन रोखले, असेही शाह म्हणाले. 7 / 15शाह यांनी दावा केला आहे, की राज्य भाजपचे सरकार आल्यास महिलांना 33 टक्के आरक्षण दिले जाईल.8 / 15दक्षिण 24 परगना जिल्ह्यात नामखाना येथे जनतेला संबोधित करताना शाह म्हणाले, भाजपची लढाई बंगालला 'सोनार बांग्ला' बनविण्याची आहे. 9 / 15आपल्या 5व्या परिवर्तन यात्रेची सुरुवात करताना शाह म्हणाले, ममता बॅनर्जींचे सरकार हटविणे हा भाजपचा उद्देश नाही. तर, पश्चिम बंगालची स्थिती बदलणे, राज्यातील गरिबांची परिस्थिती बदलणे आणि राज्यातील महिलांची परिस्थिती बदलणे, हा आहे. 10 / 15यावेळी शाह यांनी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरकारवर राज्यात नमामी गंगे कार्यक्रम लागू न करण्याचा आरोप केला. 11 / 15बंगालमध्ये शाह यांनी गंगासागर, कपिल मुनी आश्रम, भारत सेवाश्रम संघालाही भेट दिली. 12 / 15अमित शाह यांनी गंगासागर येथील कपिल मुनी आश्रमात पूजाही केली.13 / 15दक्षीण 24 परगाना गंगासागर येथे गृहमंत्री अमित शाह. 14 / 15सेवाश्रम येथे शाह यांनी संस्थापक स्वामी प्रणवानंद यांच्या 125व्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजलीही अर्पण केली. 15 / 15अमित शाह यांनी अरबिंदो भवनलाही भेट दिली. राज्यात या वर्षी एप्रिल-मे महिन्यात निवडणूका होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications