शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कुछ तो गडबड है! काश्मीरमधील हे फोटो पाहून तुम्हालाही हेच वाटेल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2019 11:00 AM

1 / 7
जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून हजारो अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत. काश्मीर प्रश्नी केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार असल्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात कडेकोट बंदोबस्त लावला आहे. श्रीनगरला छावणीचं स्वरुप आलं आहे. पर्यटक आणि भाविकांना राज्याबाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरु आहेत.
2 / 7
राज्यातील नाकानाक्यांवर पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रत्येकावर हालचालींवर बारीक नजर ठेवली जात आहे.
3 / 7
राज्यातील नाकानाक्यांवर पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रत्येकावर हालचालींवर बारीक नजर ठेवली जात आहे.
4 / 7
फुटिरतावाद्यांचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीनगरमध्ये छावणीचं स्वरुप आलं आहे. याठिकाणी भारतीय जवान आणि सीआरपीएफकडून प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
5 / 7
जम्मू काश्मीरमधल्या परिस्थितीला पाहता पर्यटकांनीही परतीचा मार्ग पत्करला आहे.
6 / 7
संपूर्ण काश्मीरमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे. प्रशासनाकडून खबरदारीचा सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
7 / 7
काश्मीरमधलं वातावरणाची परिस्थिती पाहता स्थानिकांनी आवश्यक लागणाऱ्या वस्तू, गॅस सिलेंडर, खाण्या-पिण्याच्या वस्तू, औषधे खरेदी करुन ठेवली आहे.
टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरSection 144जमावबंदीtourismपर्यटन