शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

वात्सल्याचे स्वरूप राम... अयोध्येतील श्रीरामाचं राजस रूप, निरागस डोळे अन् गोड हसू पाहून हरखून जाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 1:44 PM

1 / 9
अयोध्येतील राम मंदिरात मंत्रोच्चाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामलला यांनी अभिषेक केला. हा अभिषेक सोहळा ८४ सेकंद सुरू होता. मंदिरातील गर्भगृहातील फोटो पहिल्यांदाच समोर आले आहेत.
2 / 9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभ मुहूर्तावर राम ललाचा अभिषेक केला. यानंतर अयोध्या जय श्री रामच्या घोषणांनी दुमदुमली. यानंतर राम मंदिर परिसरात हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
3 / 9
सुरुवातीला पीएम मोदींनी राम मंदिर परिसरात पूजा केली. यावेळी आरएसएस प्रमुख मोहन भागवत उपस्थित होते.
4 / 9
गेल्या काही दिवसांपासून अभिषेक सोहळ्याची जोरदार तयारी सुरू होती. या सोहळ्याला देशातून उद्योगपतीही उपस्थित आहेत.
5 / 9
या सोहळ्यासाठी राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेकजण उपस्थित आहेत.
6 / 9
राम मंदिर परिसरात पीएम मोदी धोती-कुर्त्यामध्ये दिसत आहेत. त्यांच्या हातात चांदीची छत्री दिसत आहे. जय श्री रामचा जयघोष सर्वत्र ऐकू येत आहे.
7 / 9
चिरंजीवी, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, सचिन तेंडुलकर, विवेक ओबेरॉय, सोनू निगम, रजनीकांत, माधुरी दीक्षित, विकी कौशल, कतरिना कैफ, आयुष्मान खुराना, रणबीर कपूर, आलिया भट्ट, राजकुमार चराणी हिर यांच्यासह अनेक दिग्गज अयोध्येत आले आहेत.
8 / 9
राम मंदिराचे बांधकाम अजुनही पूर्ण झालेले नाही. मंदिराच्या बाजूला आणखी सात मंदिर बांधण्यात येणार आहेत.
9 / 9
राम मंदिराच्या बांधकामासाठी देशभरातून निधी गोळा करण्यात आला आहे. मंदिर बांधकामासाठी ५,५०० कोटी रुपये जमा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याNarendra Modiनरेंद्र मोदी