Photos: Rahul Gandhi catches fish and dives into the sea in kerala
Photos : राहुल गांधींनी मासे पकडले अन् समुद्रात डुबकीही घेतली By महेश गलांडे | Published: February 24, 2021 9:24 PM1 / 10कॉंग्रेसचे प्रमुख नेते आणि खासदार राहुल गांधी हे सध्या केरळ दौर्यावर आहेत. यावर्षी केरळमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून त्यापूर्वी राहुल गांधी वेगवेगळ्या क्षेत्रांचा दौरा करत आहेत. 2 / 10केरळमधील जनतेला बुधवारी राहुल गांधींचं एक वेगळं रुप दिसून आलं, केरळच्या कोल्लममध्ये राहुल गांधी मासेमारांसह समुद्रात गेले अन त्यांच्यासोबत मासेमारी करताना दिसले. 3 / 10राहुल गांधी यांनी येथील मासेमारांशीही चर्चा केली, त्यांच्याबरोबर नावेत बसून समुद्रात मासेमारी करण्याचा आनंदही लुटला. राहुल गांधींचा साधेपणा पाहून येथील मच्छीमारांनाही आनंद झाला. 4 / 10 कोल्लम येथे मच्छीमारांशी बोलतांना राहुल गांधी म्हणाले, ज्या पद्धतीने शेतकरी शेतात काम करतात त्याच पद्धतीने मासेमार समुद्रात काम करतात .केंद्र सरकारमध्ये शेतकर्यांसाठी स्वतंत्र मंत्रालय आहे, परंतु मासेमारांसाठी स्वतंत्र मंत्रालय नाही. 5 / 10राहुल गांधी केरळ मध्ये मच्छीमारांसोबत पाण्यात उतरले होते. तसेच त्यांच्यासोबत मासेमारी केली अन् सुमद्रात डुबली लावून पोहण्याचा आनंदही घेतला. 6 / 10राहुल गांधींनी समुद्रात पोहोतेवेळी त्यांना सुरक्षेचं कवच लावण्यात आलं होतं. त्यांच्यातील सर्वसामान्य माणूस पाहून केरळवासीय मच्छीमार भारावल्याचं दिसून आलं. 7 / 10राहुल गांधींनी येथील नागरिकांशी त्यांच्या भाषेतील काही शब्दांचा अर्थ समजावून घेतला, तसेच ते शब्दही उच्चारले होते8 / 10मच्छिमार बांधवांसोबत मासे पकडताना राहुल गांधी या फोटोत दिसत आहेत, राहुल गांधींचे हे रुप सर्वांना आवडले9 / 10निळा टी शर्ट, तोंडाला मास्क, कॉटन पँट आणि पायात स्लीपर घालून नावेतून समुद्रात उडी घेताना राहुल गांधींचा टिपलेला हा क्षण 10 / 10महाराष्ट्र काँग्रेस आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आपल्या ट्विटरवरुन राहुल गांधींचे हे फोटो शेअर केले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications