शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Photos : ये हसीं वादिया, ये खुला आसमां, 'दुलई' पांघरलेलं निसर्गरम्य शिमला...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 10:03 PM

1 / 13
पृथ्वीतलावावर कुठे स्वर्ग असेल तर ते काश्मीरमध्ये असं म्हणतात. काश्मीरच्या खोऱ्यात, वाहणाऱ्या नद्यांत, मोकळ्या आकाशात, मधुर आवाजाच्या वाऱ्यांत आणि निसर्गानं शृंगार केलेल्या काश्मीरला भेट देणं म्हणजे जिवंतपणी स्वर्ग पाहणं होय.
2 / 13
काश्मीरसह हिमाचल प्रदेशही मिनी काश्मीर म्हणून ओळखला जातो. येथे बर्फवृष्टीनंतर डोंगरदऱ्यातील, घाटांनी, रस्त्यांनी जणू पांढरी शाल पांघरल्याचे दिसून येते.
3 / 13
हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे वर्षातील पहिली बर्फवृष्टी झाली आहे. पर्यटक आणि स्थानिक हंगामातील पहिल्या वर्षवृष्टीची आतुरतेने वाट पाहत होते.
4 / 13
शनिवारी सकाळी जाखू टेकडीवर बर्फवृष्टी झाली. रिज मैदान आणि मॉल रोडवरही हलकी बर्फवृष्टी झाली.
5 / 13
बर्फाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक रिज मैदानावर पोहोचले. मात्र, हवामान खात्याने शनिवारी आणि रविवारी राज्यात यलो अलर्ट जारी केला होता.
6 / 13
कुफरी, नारकंडासह शिमल्याच्या उंच भागात बर्फवृष्टी झाली. दरम्यान, शिमला शहरात बर्फवृष्टीची लोक आतुरतेने वाट पाहत होते, ती शनिवारी पूर्ण झाली.
7 / 13
दुसरीकडे, शिमलाचे प्रसिद्ध पर्यटन स्थळ ताज्या हिमवृष्टीनंतर पर्यटकांनी गजबजून गेले होते.
8 / 13
येथे मोठ्या संख्येने पर्यटक पोहोचले. पर्यटक बर्फवृष्टीचा आनंद घेताना पाहायवा मिळाले. बर्फवृष्टीनंतर पर्यटकांचा ओघ वाढल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडीही झाली.
9 / 13
शिमलात तुफान बर्फवृष्टी झाल्याने घरे, झाडे सर्वत्र बर्फाची दुलईच पसरलेली दिसत होती. बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटकांनीही तेथे गर्दी केली आहे.
10 / 13
शिमला येथील स्थानिक रहिवासी पवन भारद्वाज यांनी ‘लोकमत’च्या वाचकांसाठी टिपलेली छायाचित्रे खास तुमच्यासाठी शेअर केली आहेत.
11 / 13
शिमला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थिओग-चौपाल रस्ता, नारकंडा भागातील थेओग-रामपूर रस्ता, खारापठार भागातील थेओग-रोहरू रस्ता शनिवारी बर्फवृष्टीमुळे बंद ठेवण्यात आला होता
12 / 13
शिमलामधील हे नयनरम्य दृश्य पाहिल्यानंतर रोजा चित्रपटातील ये हसी वादियाँ, ये खुला आसमाँ... हे गाणं आठवल्याशिवाय राहणार नाही.
13 / 13
निसर्ग सौंदर्यांचा अविष्कार आपल्या डोळ्यांत साठवण्यासाठी नक्कीच आयुष्यात एकदातरी या ठिकाणाला भेट द्यायला हवी
टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशshimla-pcशिमलाJammu Kashmirजम्मू-काश्मीर