Pilot Abhinandan viral photo in social media to support BJP
पायलट अभिनंदचा भाजपाला पाठिंबा? काय आहे अभिनंदनच्या व्हायरल फोटोमागचं सत्य? By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 7:50 PM1 / 6खरंच भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर अभिनंदनने भाजपाला पाठिंबा करण्याचं घोषित केलंय? सध्या सोशल मिडीयावर फेसबुक,ट्विटरवरुन अभिनंदनच्या नावाने एक मॅसेज व्हायरल होत आहे. यामध्ये अभिनंदनने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केलंय.2 / 6फेसबुक आणि ट्विटरवर व्हायरल होणारा हा फोटो..त्यात अभिनंदन जाहीररित्या भाजपाचं समर्थन करत मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवावं असं आवाहन करत आहे. तसेच काँग्रेसने आजपर्यंत किती जवानांना जिवंत पुन्हा भारतात आणलं असा प्रश्न उपस्थित करत आहे. 3 / 6सोशल मिडीयावर व्हायरल होणाऱ्या या फोटोला निरखून पाहिलं तर यामध्ये अभिनंदनचा खरा फोटो आणि व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये फरक जाणवून येईल. व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये अभिनंदन यांच्याप्रमाणे मिशी जरुर आहे मात्र चेहऱ्यात फरक स्पष्टपणे जाणवला असेल.4 / 6खरचं सोशल मिडीयाच्या माध्यमातून अभिनंदन वर्धमान विद्यमान भाजपा सरकारचं समर्थन करत आहे की, त्यांची प्रतिमा वापरून कोणीतरी भलताच अभिनंदन यांच्या नावाचा गैरवापर करत आहे?5 / 6पाकिस्तानातून परतल्यानंतर विंग कमांडर अभिनंदनने पुन्हा ड्युटी जॉईन केली आहे. भारतीय हवाई दलाच्या नियमांनुसार सेवेत असताना ते कोणत्याही राजकीय पक्षामध्ये सहभागी होऊ शकत नाही किंवा राजकीय पक्षाचा प्रचार करण्याचं आवाहन करु शकणार नाहीत. 6 / 6मागील महिन्यात भारतीय हवाई दलाने अधिकृतरित्या सांगितले आहे की, अभिनंदन यांचे खरे अकाऊंट सोशल मिडीयावर नाही. मात्र त्यांच्या नावाने फेक अकाऊंटवरुन मॅसेज व्हायरल केले जात आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications