शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

PM Kisan FPO Yojana: काय सांगताय! मोदी सरकार देतेय 15 लाख रुपये; असा करा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2022 2:41 PM

1 / 7
भारत सरकारकडून गरजूंसाठी वेळोवेळी अनेक प्रकारच्या योजना आणल्या जातात. देशातील सर्वसामान्य नागरिकांपासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वांना फायदा मिळेल, अशा योजना सरकारकडून राबवल्या जात आहेत. यातच देशातील शेतकऱ्यांना सरकारकडून कृषी व्यवसाय सुरू करण्यासाठी 15 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळू शकते.
2 / 7
केंद्र सरकारने शेतकर्यांसाठी पीएम किसान एफपीओ योजना (PM Kisan FPO Yojana) सुरू केली आहे. यात शेतकरी उत्पादक संघटनेला 15 लाख रुपयांपर्यंतची मदत मिळते. यासाठी 11 शेतकऱ्यांना एक संस्था किंवा कंपनी स्थापन करावी लागेल.
3 / 7
या संस्था किंवा कंपनीला सरकारकडून 15 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळू शकते. यातून शेती संबंधी सामान किंवा बियाणे इत्यादी वस्तू खरेदी करू शकता. चला तर मग जाणून घेऊया या योजनेबद्दल माहिती आणि यासाठी अर्ज कसा करायचा.
4 / 7
स्टेप 1- सर्वप्रथम तुम्हाला राष्ट्रीय कृषी बाजाराच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल, येथूनच तुम्ही या योजनेबद्दल माहिती मिळवू शकता आणि याचा लाभ घेऊ शकता.
5 / 7
स्टेप 2- या साइटवर गेल्यावर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल. येथे तुम्हाला होम पेजवर FPO च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
6 / 7
स्टेप 3- समोर दिसणार्‍या नोंदणी पर्यायावर क्लिक करून फॉर्ममध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती भरावी लागेल.
7 / 7
स्टेप 4- आता तुम्हाला तुमच्या बँक खात्याचे रद्द केलेले चेक किंवा पासबूक आणि तुमचे ओळखपत्र स्कॅन करुन अपलोड करावे लागेल. ही सर्व कागदपत्रे अपलोड केल्यावर सबमिट बटनवर क्लिक करा.
टॅग्स :FarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकार