शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मोदी सरकारचा मेगा प्लॅन! देशवासीयांना मिळणार आणखी एक युनिक कार्ड; पाहा, डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 11:40 AM

1 / 13
आताच्या घडीला देशवासीयांना ओळखपत्र म्हणून अनेक कार्ड उपलब्ध आहेत. यात सध्या सर्वांत महत्त्वाचे आहे ते आधार कार्ड. मात्र, मोदी सरकार एक नवीन योजना आणत असून, देशवासीयांना आणखी एक युनिक कार्ड मिळणार आहे.
2 / 13
‘डिजिटल इंडिया’ योजनेअंतर्गत, केंद्र सरकारने राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान सुरू केले आहे. या मोहिमेचा उद्देश आरोग्य क्षेत्रातील लोकांना जागरूक करणे आणि त्यांना आरोग्य अभियानाशी जोडणे हा आहे.
3 / 13
यासोबतच देशातील प्रत्येक व्यक्तीला उत्तम आरोग्य सुविधा पुरवाव्या लागतील. सरकारला यासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे. या उपक्रमाला डिजिटल हेल्थ मिशन असे नाव देण्यात आले आहे.
4 / 13
सामान्य नागरिकांसाठी आधार कार्डामुळे अनेक फायदे झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता मोदी सरकार भारतीय नागरिकांसाठी युनिक हेल्थ कार्ड आणण्याच्या विचारात आहे. केंद्रीय स्तरावर सध्या तशा हालचाली सुरु आहेत.
5 / 13
गेल्या काही वर्षांमध्ये आधार कार्डाच्या वापरामुळे शेतकरी आणि गरीब नागरिकांना सरकारी अनुदान किंवा संकटकाळात आर्थिक मदत थेट बँक खात्यात देणे शक्य झाले. आधार कार्डामुळे आर्थिक व्यवहारांमध्ये अधिक पारदर्शकता आली आहे, असे सांगितले जात आहे.
6 / 13
डिजिटल हेल्थ मिशन अंतर्गत सरकार प्रत्येक व्यक्तीचे एक युनिक आरोग्य कार्ड बनवणार आहे. हे कार्ड पूर्णपणे डिजिटल असेल जे दिसायला आधार कार्डसारखे असेल. या कार्डवर तुम्हाला नंबर मिळेल, तुम्हाला आधार क्रमांकाप्रमाणे एक नंबर दिला जाणार आहे.
7 / 13
आरोग्य सुविधा आणि योजनांचा लाभ घेताना या क्रमांकाद्वारे संबंधित व्यक्तीची ओळख पटवली जाईल. याद्वारे डॉक्टरांना संबंधित व्यक्तीची वैद्यकीय पार्श्वभूमी एका क्लिकवर उपलब्ध होईल. तसेच व्यक्तीला कोणते उपचार कुठे मिळाले हेदेखील कळू शकणार आहे. त्या व्यक्तीच्या आरोग्याशी संबंधित प्रत्येक माहिती या युनिक आरोग्य कार्डमध्ये नोंदवली जाईल.
8 / 13
या कार्डमुळे रुग्णाला त्याच्यासोबत प्रचंड फाईल्स बाळगाव्या लागणार नाहीत, असे म्हटले जात आहे. डॉक्टर किंवा हॉस्पिटल रुग्णाचा युनिक हेल्थ आयडी बघेल आणि त्याचा सर्व डेटा घेऊ शकतील. त्या आधारावर पुढील उपचार सुरू केले जाऊ शकतील. व्यक्तीला कोणत्या सरकारी योजनांचा लाभ मिळतो, हेदेखील या कार्डाच्या माध्यमातून समजू शकेल.
9 / 13
आयुष्मान भारत अंतर्गत उपचाराच्या सुविधांचा लाभ रुग्णाला मिळतो की नाही, हे या युनिक हेल्थ कार्डाद्वारे कळेल. युनिक हेल्थ आयडी अंतर्गत सरकार प्रत्येक व्यक्तीचा आरोग्याशी संबंधित डेटाबेस तयार करेल. या आयडीसह, त्या व्यक्तीचे वैद्यकीय रेकॉर्ड रेकॉर्ड केले जाईल.
10 / 13
या आयडीच्या मदतीने एखाद्या व्यक्तीचे संपूर्ण वैद्यकीय रेकॉर्ड पाहिले जाऊ शकते. जर ती व्यक्ती डॉक्टरकडे गेली तर तो त्याचा आरोग्य आयडी दाखवेल. या आयडीवरुन संबंधित रुग्णावर यापूर्वी कोणते उपचार केले गेले, कोणत्या डॉक्टरांचा सल्ला घेतला गेला आणि कोणती औषधे आधी दिली गेली, असा सर्व तपशील उपलब्ध होईल.
11 / 13
एखादी व्यक्ती कोणत्या वर्गात येते आणि त्याची आर्थिक स्थिती काय आहे याची माहिती सरकारला डेटाबेसमधून मिळेल. त्याच आधारावर सरकार अनुदानाचा लाभ इत्यादी देण्यास सक्षम असेल. सर्वप्रथम, ज्या व्यक्तीचा आयडी तयार होईल त्याच्याकडून मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक घेतला जाईल. या दोन नोंदींच्या मदतीने एक युनिक आरोग्य कार्ड तयार केले जाईल.
12 / 13
यासाठी, सरकार एक आरोग्य प्राधिकरण तयार करेल, जे वैयक्तिक डेटा गोळा करेल. व्यक्तीचे आरोग्य ओळखपत्र बनवायचे आहे त्याचे आरोग्य रेकॉर्ड गोळा करण्यासाठी आरोग्य प्राधिकरणाकडून परवानगी दिली जाईल. या आधारावर पुढील काम केले जाईल.
13 / 13
सार्वजनिक रुग्णालय, सामुदायिक आरोग्य केंद्र, आरोग्य आणि निरोगी केंद्र किंवा राष्ट्रीय आरोग्य इन्फ्रास्ट्रक्चर रजिस्ट्रिशी संलग्न असलेले आरोग्य सेवा प्रदाता एखाद्या व्यक्तीचे आरोग्य आयडी तयार करू शकतात.
टॅग्स :Healthआरोग्यCentral Governmentकेंद्र सरकारprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी