पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समुद्रात मारली डुबकी, लक्षद्वीप समुद्रकिनाऱ्यावर मारला फेरफटका, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 15:45 IST
1 / 7पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवार आणि बुधवारी तामिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीपच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी लक्षद्वीपमधील समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारला.2 / 7पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून त्यांच्या लक्षद्वीप दौऱ्याचे मनोरंजक फोटो शेअर केले आहेत. यावेळी त्यांनी स्नॉर्कलिंगचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.3 / 7पीएम मोदींनी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये दोन जीवरक्षक त्यांना स्नॉर्कलिंगमध्ये मदत करत आहेत.4 / 7यावेळी मोदींनी समुद्राच्या तळीतील फोटोही शेअर केले आहेत.5 / 7लक्षद्वीप भेटीबद्दल पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की, 'नयनरम्य सौंदर्यासोबतच लक्षद्वीपची शांतता देखील मंत्रमुग्ध करणारी आहे. याने मला १४० कोटी भारतीयांच्या कल्याणासाठी आणखी कठोर परिश्रम कसे करावे यावर विचार करण्याची संधी दिली.'6 / 7देशात काही महिन्यातच लोकसभा निवडणुका सुरू होणार आहेत. या निवडणुकीची तयारी सर्व पक्षांनी केली आहे.7 / 7दुसरीकडे अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी होणार आहे. याची तयारीही जोरदार सुरू आहे.