शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

उद्यापासून कामाला लागा! १५ दिवस १५ टास्क; पंतप्रधान मोदींनी खासदारांना यादीच दिली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2022 3:20 PM

1 / 9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पक्षाच्या सर्व खासदारांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. उद्या भाजपचा स्थापना दिवस आहे. उद्यापासून २० एप्रिलपर्यंत खासदारांनी केंद्राच्या महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी योजनांचा प्रसार-प्रचार करावा अशा सूचना मोदींनी दिल्या आहेत.
2 / 9
जनतेत जाऊन काम करा, लोकांशी संवाद साधा, केंद्राच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवा, अशी सूचना मोदींनी भाजपच्या सर्व खासदारांना दिली. भाजपच्या संसदीय दलाच्या बैठकीत ते बोलत होते. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये भाजपची बैठक संपन्न झाली.
3 / 9
भाजप उद्यापासून स्थापना दिवस पंधरवडा साजरा करणार आहे. त्यानिमित्तानं दररोज एक कार्यक्रम हाती घेण्याची जबाबदारी मोदींनी दिली आहे. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचा आणि त्याला सामाजिक न्याय मिळेल यासाठी प्रयत्न करा, असं मोदींनी खासदारांना सांगितलं आहे.
4 / 9
संसदेचं अधिवेशन सुरू असताना दर मंगळवारी भाजपच्या संसदीय दलाची बैठक होती. बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह वरिष्ठ नेते, पक्षाचे खासदार उपस्थित होते. मोदींनी खासदारांना १५ टास्क दिले आहेत.
5 / 9
उद्या भाजपचा स्थापना दिन आहे. पंतप्रधान मोदी पक्ष कार्यकर्त्यांशी व्हर्च्युअल संवाद साधतील. यावेळी सर्व खासदारांनी संसदेच्या ऍनेक्सी भवनात उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली आहे.
6 / 9
७ एप्रिलला खासदारांना आयुष्यमान भारताच्या जन औषधी केंद्रावर जावं लागेल. तिथलं काम कसं चालतं ते पाहावं लागेल. ८ एप्रिलला भाजपचे खासदार त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामाचं मूल्यांकन करतील. ९ एप्रिलला हर घर नल, हर घर जल योजनेचा आढावा घेतील.
7 / 9
११ एप्रिलला भाजप खासदार आपल्या मतदारसंघात ज्योतिबा फुले दिवस साजरा करतील. १२ एप्रिलला लसीकरण केंद्रावर जातील. १३ एप्रिलला प्रधानमंत्री अन्न योजनेचा आढावा घेतील. योजनेचा लाभ आणखी लाभार्थ्यांना कसा मिळेल ते पाहतील.
8 / 9
१४ एप्रिलला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात येईल. १५ एप्रिलला एसटी दिवस साजरा केला जाईल. १६ एप्रिलला असंघटित क्षेत्राच्या योजनांवर लक्ष केंद्रीत करतील.
9 / 9
१७ एप्रिलला भाजप खासदारांना आर्थिक समावेशक योजनांना अधिक प्रभावीपणे लागू करण्यासाठी काम करावं लागेल. १८ एप्रिलला शेतीसाठीच्या योजनांबद्दल लोकांना जागरूक करण्यात येईल. १९ एप्रिलला पोषण अभियान आणि अंगणवाडी केंद्रात जावं लागेल. २० एप्रिलला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या अंतर्गत आपापल्या क्षेत्रात फारशा चर्चेत नसलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना मानवंदना देण्यात येईल.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा