शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांवर आतापर्यंत किती खर्च झाला?; अखेर आकडा समोर आला

By कुणाल गवाणकर | Published: September 22, 2020 4:36 PM

1 / 10
कोरोना संकट काळात संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. रविवारी राज्यसभेत झालेल्या गोंधळामुळे वातावरण तापलं आहे. मात्र लिखित स्वरुपात प्रश्नांची उत्तरं मिळत आहेत.
2 / 10
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे परदेश दौरे कायम चर्चेचा विषय राहिला आहे. मोदी देशात कमी आणि परदेशात जास्त असतात, अशी टीका वारंवार विरोधकांकडून होत असते.
3 / 10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यांवर कोट्यवधींचा खर्च होतो. मात्र त्यातून हाती काय लागतं, असे प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केले जात आहेत.
4 / 10
आज संसदेत परराष्ट्र मंत्रालयानं मोदींच्या दौऱ्यांवर झालेल्या खर्चाचा नेमका आकडा सांगितला आहे. मोदींनी २०१५ पासून आतापर्यंत ५८ देशांना भेटी दिल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली.
5 / 10
एका खासदारानं मोदींचे दौरे आणि त्यावर होणारा खर्च याबद्दल प्रश्न विचारले होते. त्यावर २०१५ पासून आतापर्यंत मोदींच्या दौऱ्यांवर ५१७.८२ कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली.
6 / 10
पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यादरम्यान भारतानं अनेक देशांसोबत करार केले. यामध्ये व्यापार, गुंतवणूक, संरक्षण करारांचा समावेश आहे.
7 / 10
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून मोदींनी कोणताही परदेश दौरा केलेला नाही.
8 / 10
गेल्या सहा महिन्यांत एकही आंतरराष्ट्रीय नेता भारतात आलेला नाही. फेब्रुवारीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात आले होते. त्यानंतर कोणताही मोठा नेता भारत दौऱ्यावर आलेला नाही.
9 / 10
कोरोना संकट काळात पंतप्रधान मोदी परदेशातील नेत्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधत आहेत.
10 / 10
मोदींनी अनेकदा आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातूनच सहभाग घेतला आहे. मोदी याच आठवड्यात संयुक्त राष्ट्राला संबोधित करणार आहेत. हा कार्यक्रमदेखील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातूनच होईल.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी