शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

योगासनं करताना मोदींनी घेतलेलं उपरणं साधंसुधं नाही बरं!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 1:48 PM

1 / 7
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धोरणं, त्यांच्या भूमिका, त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांची भाषणं-मुलाखती यांची जेवढी चर्चा होते, तेवढीच त्यांच्या पेहेरावाची, वेशभूषांचीही झाल्याचं आपण पाहिलंय. मग तो 'नरेंद्र दामोदरदास मोदी' असं स्वतःचं नावं कोरलेला कोट असेल किंवा स्वातंत्र्यदिनी बांधलेला फेटा... मोदींची स्टाईल लक्ष वेधून घेणारी ठरलीय. तसंच काहीसं, त्यांनी आज योगासनं करताना गळ्यात घातलेल्या उपरण्याविषयी म्हणता येईल. गेली तीन वर्षं आंतरराष्ट्रीय योग दिनाला त्यांच्या गळ्यात याच डिझाइनचं उपरणं पाहायला मिळालंय. कारण, हे उपरणं साधंसुधं नाही. त्याची एक खासियत आहे.
2 / 7
या उपरण्याचं कनेक्शन भारताचं पूर्वेतील राज्य आसामशी आहे. हे एक आसामी उपरणं आहे. जे गळ्यात घालून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा बघण्यात आलं आहे. गेल्या तीन वर्षांपासून मोदी योग दिवसाला हेच उपरणं वापरताना दिसत आहेत.
3 / 7
याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिरंगी आणि त्रिभुजाकार उपरणं वापरताना दिसले होते. या आसामी उपरण्याला स्थानिक 'गमुसा' असं म्हणतात. हे उपरणं देशातील वेगवेगळ्या भागात लोकप्रिय आहे.
4 / 7
या उपरण्याचा कापड फारच सॉफ्ट असतो. त्यामुळे याने घाम तर चांगला पुसला जातोच, सोबतच याने उन्हापासूनही बचाव होतो.
5 / 7
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, आसामी उपरण्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद आहे. हे जगातलं सर्वात लांब उपरणं आहे. ज्याची लांबी १,४५५.३ मीटर इतकी आहे.
6 / 7
पंतप्रधान नरेंद्र मोदी योग दिवसाव्यतिरिक्त आणखीही काही खास कार्यक्रमांवेळी हे उपरणं गळ्यात घालून दिसले आहेत. पूर्णपणे कॉटनपासून तयार या उपरण्याच्या दोन्ही टोकांवर लाल रंगाची सुंदर डिझाइन केलेली असते.
7 / 7
पंतप्रधान नरेंद्र मोदी योग दिवसाव्यतिरिक्त आणखीही काही खास कार्यक्रमांवेळी हे उपरणं गळ्यात घालून दिसले आहेत. पूर्णपणे कॉटनपासून तयार या उपरण्याच्या दोन्ही टोकांवर लाल रंगाची सुंदर डिझाइन केलेली असते.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीInternational Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिन