pm modi woman spg commando photo true story in marathi
PM मोदींच्या सुरक्षेसाठी महिला 'एसपीजी कमांडो', काय आहे व्हायरल फोटोचं सत्य? By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 12:53 PM1 / 7हा फोटो तुम्हीही बघितला असेल, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एक महिला अधिकारी दिसत आहे. हा फोटो भाजपच्या खासदार कंगना रणौत यांनीही शेअर केला आहे.2 / 7फोटोमध्ये पंतप्रधान मोदी यांच्यासोबत दिसणारी महिला अधिकारी आहे, ती स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणजे एसपीजी कमांडो असल्याचा दावा केला जात आहे. कंगना रणौत यांनीही हाच दावा केला आहे.3 / 7सोशल मीडियावरही लोक हाच फोटो शेअर करत आहेत. त्याचबरोबर मोदी सरकारने महिला सक्षमीकरणाला चालना दिल्याचे लोक म्हणत आहेत.4 / 7पण ही महिला अधिकारी कोण आहे, याबद्दल जाणून घेण्यासाठी पुढील काही फोटो बघणे आवश्यक आहे. हे फोटो बघितल्यानंतर तुम्हाला या अधिकाऱ्याबद्दल सगळे माहिती होईल.5 / 7हे फोटो बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की, ही महिला अधिकारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसत आहे. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संविधान दिवस साजरा झाला. या कार्यक्रमाला राष्ट्रपती मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हजर होते.6 / 7जेव्हा हे सगळे कार्यक्रमासाठी सभागृहात जात होते. तेव्हा महिला अधिकारी राष्ट्रपतींच्या मागे चालत आहे. ही महिला पंतप्रधानांच्या बाजूला असून, मंत्री किरण रिजिजू दिसत आहेत. व्हायरल फोटो वेगळ्या बाजूने घेतला असल्यामुळे पंतप्रधान मोदी, किरण रिजिजू आणि महिला अधिकारी दिसत आहेत आणि बाकीचे लोक दिसत नाही.7 / 7एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, फोटोत दिसणारी महिला अधिकारी एसपीजी कमांडो नसून, सीआरपीएफच्या असिस्टंट कमांडण्ट अधिकारी आहे. ही महिला राष्ट्रपतींच्या पर्सनल सेक्युरिटी अधिकारी आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications