PHOTOS: संसदेत जेव्हा मोदी-सोनिया आमने-सामने येतात अन् शिंदेंनीही वेधलं लक्ष!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 16:38 IST
1 / 10पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी हे दोघेही शपथविधी सोहळ्यात सहभागी झाले होते. एक वेळ अशी आली की दोन्ही नेते आमने-सामने आले. दोघांनी एकमेकांना हात जोडून अभिवादन केलं. यात मध्येच मल्लिकार्जुन खरगे आणि इतर नेते देखीलसोबत होते. 2 / 10राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथ घेतल्यानंतर सर्वांचे आभार मानले. जेव्हा त्या पीएम मोदींसमोर आल्या तेव्हा पंतप्रधान उभे राहिले आणि नवनिर्वाचित राष्ट्रपतींना अभिवादन केलं. 3 / 10भारताच्या १२व्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनीही शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली होती. पाटील यांची तब्येत खराब असल्याने राष्ट्रपती मुर्मू स्वत: त्यांच्या जवळ आल्या आणि वाकून नमस्कार केला.4 / 10राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निरोप दिला. यावेळी कोविंद यांचे नातेवाईक देखील उपस्थित होते. 5 / 10महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे हे देखील शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्याशी ते गप्पा मारताना दिसले.6 / 10सोनिया गांधी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशींनी पुढाकार घेतला. दिग्गज नेत्यांमध्ये काहीवेळ गप्पा रंगल्या.7 / 10अमित शहा आणि नरेंद्रसिंग तोमर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर हलक्याफुकल्या वातावरणात गप्पा मारताना दिसले.8 / 10देशाच्या १५ व्या राष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्याला अनेक खासदारही आवर्जुन उपस्थित होते. 9 / 10गार्ड ऑफ ऑनरनंतर मोदी रवाना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सन्मानार्थ गार्ड ऑफ ऑनरनंतर पंतप्रधान मोदी राष्ट्रपती भवनातून रवाना झाले.10 / 10तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदर्यराजन आणि केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे एकमेकांशी संवाद साधताना. एक महिला देशाच्या राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्यामुळे दोन्ही महिला नेत्यांना आनंद झाला