PM मोदींकडे नेमकं काय-काय? किती कॅश, घर आणि कार किती, जाणून घ्या नेमकी माहिती... By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 9:21 AM
1 / 8 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ७२ वर्षांचे झाले आहेत. मोदींच्या संपत्तीबाबत नेहमीच चर्चा केली जाते. त्यांच्या नावावर नेमकी किती घर, कार आणि इतर संपत्ती आहे याची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल तर याची नेमकी माहिती आता समोर आली आहे. यात अगदी मोदींनी नेमकी कुठं-कुठं गुंतवणूक केलीय याचीही माहिती मिळाली आहे. 2 / 8 पंतप्रधान कार्यालयाकडून मोदींच्या संपत्तीची इत्यंभूत माहिती जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एकूण २.२३ कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. पीएमओनं दिलेल्या माहितीनुसार मोदींच्या संपत्तीत गेल्या एका वर्षात २६ लाख रुपयांची वाढ झाली आहे. 3 / 8 मोदींच्या २.२३ कोटी संपत्तीपैकी बहुंताश वाटा रोख आहे. ही रोख त्यांच्या बँक खात्यात जमा आहे. मोदींच्या संपत्तीच्या ताज्या आकडेवारीनुसार त्यांच्या नावावर कोणतीही अचल संपत्ती (Immovable Assets) नाही. त्यांनी गुजरातच्या गांधीनगर येथे त्यांच्या नावावर असलेली जमीन दान केली आहे. 4 / 8 पीटीआयच्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्याही बॉन्ड, शेअर किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक केलेली नाही. तसंच त्यांच्या नावावर कोणतंही वाहन नाही. पण मोदींकडे १.७३ लाख किमतीच्या चार सोन्याच्या अंगठ्या आहेत. ३१ मार्च २०२२ पर्यंतच्या घोषित संपत्तीची माहिती पीएमओच्या वेबसाइटवर देखील जाहीर करण्यात आलेली आहे. 5 / 8 पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी ऑक्टोबर २००२ मध्ये गांधीनगरमध्ये एक जमीन खरेदी केली होती. या जमीनीमध्ये ते तिसरे भागीदार होते. ताज्या माहितीनुसार सर्व्हे नंबर ४०१/ए या मोदींच्या हिश्श्याची जमीनाचा कुणीही मालक नाही. कारण मोदींनी त्यांच्या हिश्श्याची जमीन दान केली आहे. 6 / 8 ३१ मार्च २०२२ च्या स्थितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे रोकड फक्त ३५,२५० रुपये इतकी आहे. याशिवाय पोस्ट ऑफिसमध्ये ९,०५,१०५ रुपये नॅशनल सेविंग्स सर्टिफिकेटमध्ये जमा आहेत. तसंच मोदींच्या नावाची १,८९,३०५ रुपयांची जीवन विमा पॉलिसी देखील आहे. 7 / 8 2014 साली पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी कोणतीही संपत्तीची खरेदी केलेली नाही. त्यांच्या रेसिडेंशनल प्रॉपर्टीची बाजार भावानुसार सध्याची किंमत १.१ कोटी रुपए इतकी आहे. 8 / 8 अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात सरकारने निर्णय घेतला होता की सार्वजनिक जीवनात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी सर्व केंद्रीय मंत्र्यांनी प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी त्यांची मालमत्ता आणि दायित्वे स्वेच्छेने जाहीर करावी लागतील. पंतप्रधान मोदींच्या संपत्तीची माहिती सार्वजनिक डोमेनमध्ये उपलब्ध आहे. पंतप्रधानांच्या वेबसाइटवर याची माहिती पाहता येते. आणखी वाचा