शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

PM Modi EWS Delhi Flats: पंतप्रधान मोदींनी गरिबांना दिलेले फ्लॅट्स पाहिलेत का? Inside Photos एकदा पाहाच...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2022 11:58 AM

1 / 8
PM Modi EWS Flats: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना फ्लॅट्स सुपूर्द केले आहेत. दिल्लीतील कालकाजी भागातील झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना पंतप्रधानांनी फ्लॅटच्या चाव्या सुपूर्द केल्या. आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांसाठी तयार करण्यात आलेल्या या फ्लॅटमध्ये सर्व आधुनिक सुविधा आहेत.
2 / 8
एकूण ३,०२४ सदनिका बांधण्यात आल्या आहेत. हे फ्लॅट्स दिल्लीतील कालकाजीमध्ये आहेत. महत्वाचं म्हणजे हे फ्लॅट्स सिटू फ्लॅट्समध्ये आहेत. दिल्लीतील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे. गुजरातमध्ये यापूर्वीही असे प्रकल्प झाले आहेत.
3 / 8
दिल्लीच्या कालकाजी भागात हे उंचच उंच टॉवर उभारण्यात आले आहेत. या भागात झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना आता पक्की आणि मॉर्डन सुविधा असलेली घरं मिळणार आहेत. त्यामुळे संबंधित परिसराचा चेहरा मोहरा बदलणार आहे.
4 / 8
प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एकूण ३४५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. फ्लॅटमध्ये सर्व आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत.
5 / 8
सोसायटीमध्ये लोकांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधांची काळजी घेण्यात आली आहे. फ्लॅट फिनिशिंग देखील उत्कृष्ट आहे. यामध्ये चांगल्या टाइल्सचाही वापर करण्यात आला आहे.
6 / 8
या सदनिकांमध्ये राहणाऱ्या लोकांना लिफ्ट, कम्युनिटी पार्क, इलेक्ट्रिक सब स्टेशन, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. याशिवाय दुहेरी पाण्याच्या पाइपलाइनही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
7 / 8
फ्लॅटमध्ये सिरॅमिक टाइल्सचा वापर करण्यात आला आहे. किचनमध्ये उदयपूर ग्रीन मार्बलचा वापर करण्यात आला आहे.
8 / 8
दिल्लीतील हे फ्लॅट्स पाहून तुमच्याही मनला भावले असतील. आता अशाच प्रकारचे प्रकल्प देशभर सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
टॅग्स :delhiदिल्ली