PM Narendra Modi's new Mercedes Maybach Car News: Govt Sources Clarify On Price
नरेंद्र मोदींच्या सुरक्षेसाठी 'मर्सिडीज मेबॅक'च का घेतली? कारची खरी किंमत 12 कोटी नाही By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 3:58 PM1 / 8 नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक सुरक्षेत जोडलेली मर्सिडीज मेबॅक कार सध्या खूप चर्चेत आहे. या कारबाबत माध्यमांमध्ये विविध तर्क लावले जात आहेत. पण, सरकारी सूत्रांनी आता या कारची खरी किंमती आणि इतर वैशिष्ट्यांबाबत माहिती दिली आहे.2 / 8 सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधानाच्या सुरक्षेत नवीन गाड्या आल्या नसून, फक्त अपग्रेड केल्या आहेत. हा नियमित बदलाचा भाग आहे. 3 / 8 यापूर्वी पंतप्रधान बीएमडब्लू कंपनीची कार वापरत होते. पण, कंपनीने आता तशाप्रकारची कार बनवणे बंद केल्यामुळे हीन मर्सिडीज मेबॅक घेण्यात आली आहे.4 / 8 पीएम मोदींच्या ताफ्याच्या गाडीच्या किमतीबाबतचे वृत्त चुकीचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या संदर्भात एका अधिकृत सूत्राने सांगितले की, कारची किंमत खूप कमी आहेत.5 / 8 काही रिपोर्ट्समध्ये मेबॅक कारची किंमत 12 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. पण, प्रसारमाध्यमांमध्ये सांगितलेल्या किमतींच्या एक तृतीयांशपेक्षाही कमी किंमत या कारची आहे. 6 / 8 सूत्रांनी सांगितले की, एसपीजी संरक्षणात वापरल्या जाणार्या गाड्या बदलण्यासाठी सहा वर्षांचा निकष आहे आणि पंतप्रधानांच्या आधीच्या गाड्या आठ वर्षे वापरल्या गेल्या होत्या. 7 / 8 दरम्यान, नवीन कार खरेदीचा निर्णय सुरक्षा एजन्सी घेतात, पंतप्रधान नाही. सुरक्षा वाहनाच्या खरेदीशी संबंधित निर्णय संरक्षित व्यक्तीच्या धोक्याच्या जाणिवेवर आधारित असतो.8 / 8 गाडी किंवा इतर वस्तुच्या खरेदीचा निर्णय SPG स्वतंत्रपणे घेतात. तसेच, संरक्षित व्यक्तीच्या कारच्या सुरक्षा वैशिष्टांबाबत सांगता येत नाही. कारण, यामुळे त्या व्यक्तीचा जीव धोक्यात जाऊ शकतो. आणखी वाचा Subscribe to Notifications