काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्ये पंतप्रधानांनी जवानांसोबत साज-या केलेल्या दिवाळीचे क्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2017 18:33 IST
1 / 5जम्मू-काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय लष्कर आणि बीएसएफच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. पंतप्रधानांनी यावेळी जवानांना मिठाई आणि भेटवस्तू दिल्या. 2 / 5पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:हाच्या हाताने यावेळी जवानांना लाडू भरवले. 3 / 5 प्रत्येकासारखी मलासुद्धा माझ्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्याची इच्छा असते. तुम्ही माझे कुटुंबच आहात अशा भावना पतंप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केल्या. 4 / 5पंतप्रधानांनी सलग चौथी दिवाळी जवानांसोबत साजरी केली. यंदा उत्तर काश्मीरमधील गुरेज सेक्टरमध्ये सीमारेषेजवळ १५ कॉर्प्सच्या जवानांबरोबर दिवाळी साजरी केली. 5 / 5प्रियजनांपासून दूर राहून तुम्ही मातृभूमीचे रक्षण करता. यातून बलिदानाची सर्वोच्च परंपरा दिसून येते. देशांच्या सीमांवर तैनात असलेले सर्व जवान शौर्य आणि समर्पणाचे प्रतीक आहेत असा संदेश मोदींनी व्हिजिटर बुकमध्ये लिहीला आहे.