शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Pokhran Nuclear Test: वेळ हुकलेली! भारताच्या पहिल्या अण्वस्त्र चाचणीचे बटन कोणी दाबले? वाचा पडद्यामागची स्टोरी...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 12:15 PM

1 / 9
भारताच्या पहिल्या अण्वस्त्राच्या चाचणीचे बटन दाबणारे प्रणब दस्तीदार या जगात नाहीत. त्यांचे ११ फेब्रुवारीला अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात निधन झाले. कोण होते हे दस्तीदार? जगाचा विरोध असताना भारताने तेव्हा अण्वस्त्रांची निर्मिती केली होती. आज युक्रेनवरून अणुबॉम्ब संपन्न असणे किती महत्वाचे आहे हे जगाला दिसले आहे. एकेकाळी जगातील सर्वाधिक तिसऱ्या क्रमांकाचे अणुबॉम्ब असलेल्या देशावर आज हल्ला झाला आहे. ते वाचविता आले असते.
2 / 9
१८ मे १९७४ मध्ये स्मायलिंग बुद्धा या कोडनेचे ऑपरेशन भारतात राबविले गेले, यानुसार भारताने अत्यंत गुप्त पद्धतीने अणुबॉम्बची चाचणी घेतली. दस्तीदार यांना 1975 ला पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. ते भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरचे संचालक देखील राहिले आहेत. याशिवाय युच्या आयएईएचे देखील संचालक राहिले आहेत.
3 / 9
प्रणब दस्तीदार यांनी वैज्ञानिक म्हणून भारताची पहिली स्वदेशी पाणबुडी आयएनएस अरिहंतच्या रिअॅक्टरच्या डिझाईन आणि डेव्हलपमेंटमध्ये महत्वाची भूमिका निभावली होती.
4 / 9
प्रणब रेवतीरंजन दस्‍तीदार यांच्या खांद्यावर पोखरणमध्ये इलेक्ट्रॉनिक डेटोनेशन सिस्‍टीम टीमची जबाबदारी देण्यात आली होती. या संपूर्ण प्रकल्पाची माहिती काही लोकांनाच होती.1967 ते 1974 दरम्यान ७५ संशोधक आणि इंजिनिअर्सनी देशाचे पहिले अण्वस्त्र तयार केले. १५ मे १९७४ ला डिव्हाईस शाफ्टमध्ये बसविण्यात आले होते.
5 / 9
तीन दिवस बाकी होते. अमेरिकेना कुणकुण लागली होती. दस्तीदार आणि त्यांची टीम टेस्ट साईटपासून ५ किमी दूर एका बंकरमध्ये होती. चाचणीची वेळ सकाळी ८ ठरविण्यात आली. मात्र, ही वेळ टळली. तेव्हा जर दस्तीदार यांनी बटन दाबले असते तर भारताने एक महत्वाचा इंजिनिअर गमावला असता.
6 / 9
इंजिनिअर वीएस सेठी हे अणुबॉम्बच्या क्षेत्रातच अडकले होते. ते हाय स्पीड कॅमेरे तपासण्यासाठी गेले होते. परंतू त्यांची जीप सुरु होत नव्हती. भारतीय सैन्याचे जवानही सेठी यांच्यासोबत होते. त्यांनी जीप दुरुस्त करण्याचे प्रयत्न केले. यात वेळ गेला.
7 / 9
इंजिनिअर सेठी आणि जवान सुखरूप मागे परतल्याचे समजल्यावर दस्तीदार यांनी अणुबॉम्बचे बटन दाबले, त्याचवेळी अवघे जग हादरले होते. भारताने यशस्वीरित्या अणुबॉम्बची चाचणी घेतली होती.
8 / 9
पोखरणमध्ये अण्वस्त्र चाचणी घेतली जातेय याची भारत सरकारमधील फक्त तीन व्यक्तींना माहिती होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, त्यांचे पीए पीएन हसकर आणि डीपी धार.
9 / 9
अणुबॉम्बचे बटन कोण दाबणार यावरून चर्चा सुरु होती. यावेळी ज्याने ट्रिगर तयार केला तोच अणुब़ॉम्बचे बटन दाबेल असे ठरले. हा मान दस्‍तीदार यांना मिळाला.
टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया