Police reveal gangrape chats sent by girl to test boy's character mac
शारीरिक संबंध ठेवणार का?; मुलीने मुलगा बनून मुलालाच विचारला प्रश्न अन्... By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 3:10 PM1 / 8 दिल्लीत साधारणपणे सतरा-अठरा वर्ष वयोगटातील मुलांनी इन्स्टाग्रामवर BoisLocker-Room असा एक ग्रुप तयार केला. यामध्ये मुलींचे अश्लिल फोटो शेअर करून आक्षेपार्ह चॅट केले जात होते़ ग्रुपवर काही शालेय विद्यार्थी अश्लील चॅट करत होते. या ग्रुपमध्ये मुलींचे फोटो टाकून सामूहिक बलात्कार करण्याची चर्चा सुरू होती. एका ट्विटर युजरने ग्रुपवरील स्क्रीन शॉट काढून तो सोशल मीडियावर टाकल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. 2 / 8तसेच यामध्ये अनेक मुलींचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करून त्यातले फोटोही त्यांनी यासाठी वापरले होते. धक्कादायक बाब म्हणजे काही मुलीही 'बॉइज लॉकर रूम' या ग्रुपमध्ये सामील असल्याचे उघडकीस आले होते. हा सर्व प्रकार उघड झाल्यानंतर इन्स्टाग्रामकडून हे पेज बंद करण्यात आलं आहे. मात्र या प्रकरणात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.3 / 8बॉइज लॉकर रूम'च्या तपासणीनंतर पोलिसांसमोर एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. एका मुलीने मुलगा असल्याचे भासवण्यासाठी सिद्धार्थ या नावाने स्नॅपचॅटवर बनावट अकाऊंट उघडलं. त्यानंतर त्या मुलीने आपल्या क्लासमधील एका मुलाला तिच्यासोबत लैंगिक अत्याचार करण्याविषयी विचारणा केली होती, अशी माहिती आता समोर आली आहे. 4 / 8 या मुलीने सिद्धार्थ या नावाने बनाटवट अकाऊंट तयार केले. या अकाऊंटवरून ही तरूणी क्लासमधील एका मुलाशी चॅट करत होती. यामध्ये ती मुलगी स्वत:वर लैंगिक अत्याचार करण्याची योजना आखण्याबाबत त्याच्याशी बोलायची. 5 / 8आपल्यावर अत्याचार करण्याबाबत तो मुलगा काय प्रतिक्रिया देतो हे संबंधित मुलीला बघायचे होते. मात्र समोरील मुलाने असा लैंगिक अत्याचार करण्यास नकार देत या चॅटवर बोलणे देखील बंद केले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.6 / 8 बनावट अकाऊंट तयार करणारी ही मुलगी आणि संवाद साधणारा मुलगा एकाच परिसरात राहतात. या मुलाचे चारित्र्य किती भक्कम आणि ठाम आहे, हे देखील या मुलीला तपासायचे होते. मात्र संवाद साधणारा हा मुलगा प्रत्यक्षात मुलगा नसून ती मुलगी असल्याचे पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर समोर आले आहे.7 / 8या मुलीने लैंगिक अत्याचाराबाबत मुलाशी चर्चा केल्यानंतर मुलाने आपल्या संवादाचे स्क्रीन शॉट काढले आणि ते आपल्या मित्रांना पाठवले. त्यानंतर त्याच्या मित्रांपैकी एकाने हा संवाद इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. त्यानंतर हा संवाद व्हायरल झाला सर्वत्र व्हायरल झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.8 / 8 दरम्यान, पोलिसांनी आतापर्यंत या ग्रुपच्या अॅडमीनला नोएडा येथून अटक केली आहे. २७ मुलांपैकी २४ जणांची चौकशी पूर्ण झाली आहे. या मुलांपैकी दोघांशी संपर्क होऊ शकलेला नाही. आणि उर्वरित एक मुलगा कोण आहे याचा तपास सुरू आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications