Political leaders use this cars in election campaigns
या अलिशान गाड्यातून राजकीय नेते करतात प्रचार By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2019 1:19 PM1 / 5 Toyoto Fortuner ही गाडी सध्या देशातील नेत्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे. या गाडीची किंमत 27 लाख ते 32 लाखांपर्यंत आहे. राहुल गांधी, अमित शहा, अरुण जेटली, वसुंधरा राजे, कुमार विश्वास यासारखे अनेक नेते या गाडीला पसंती देतात. 2 / 5टाटा सफारी - देशातील नेत्यांच्या प्रचारासाठी दुसरी लोकप्रिय गाडी ती म्हणजे टाटा सफारी, विविध पक्षाचे नेते प्रचारासाठी या गाडीचा वापर करताना दिसतात. 1998 साली ही गाडी बाजारात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही टाटा सफारी गाडीचा वापर करताना दिसतात.3 / 5टॉयोटो इनोवा - सध्या या गाडीची चलती अनेक आमदारांमध्ये पाहायला मिळते. नवीन आलेल्या या गाडीची किंमत 15 लाखांपासून सुरु होते. गाव-खेड्यांमध्ये प्रचाराला जाण्यासाठी या गाडीचा बराच उपयोग होतो. 4 / 5स्कॉर्पियो - ही गाडी पहिल्यांदा भारतीय बाजारात 2002 साली आली. या गाडीची किंमत 10 लाखापासून सुरु होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी या गाडीत बसल्याचे अनेकदा पाहिलं आहे.तसेच अनेक नेत्यांच्या पसंतीची ही गाडी आहे. 5 / 5महिंद्रा थार - जीपचा पुढचा मॉडेल असणारी ही कार प्रचारात बहुतेक प्रमाणात वापरली जाते. या गाडीचा रुफ टॉप उघडल्यानंतर उमेदवारांना प्रचार रॅलीसाठी ही गाडी सोयीस्कर पडते. आणखी वाचा Subscribe to Notifications