Politician who belong to 100 crore club
आई शप्पथ... 'या' नेत्यांकडे कुबेराचाच खजिना, संपत्ती 100 कोटींहून जास्त By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2018 1:20 PM1 / 9जया बच्चन : राज्यसभेच्या सदस्य आणि अभिनेत्री जया बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी चौथ्यांदा राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला होता. दाखल केलेल्या अर्जानुसार, जया व अमिताभ बच्चन यांच्याकडे 1 हजार कोटी रुपये एवढी संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे. 2012 पासून ते आतापर्यंत त्यांच्या संपत्तीमध्ये दुप्पटीनं वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. 2012 मध्ये त्यांच्याकडे 500 कोटी रुपये एवढी संपत्ती होती. 2 / 9अभिषेक सिंघवी : श्रीमंत नेत्यांच्या यादीमध्ये जया बच्चन यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर अभिषेक सिंघवी यांचे नाव येते. पश्चिम बंगालमधील काँग्रेसचे खासदार अभिषेक मनु सिंघवी यांच्याकडे 860 कोटी रुपयांची संपत्ती आहे. 3 / 9जयदेव गाल्ला : 100 कोटी रुपयांहून अधिक संपत्ती असलेल्या राजकीय नेत्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर तेलुगू देसम पार्टीचे नेते जयदेव गाल्ला यांचे नाव आहे. त्यांची एकूण संपत्ती 683 कोटी रुपये एवढी आहे. सध्या ते आंध्र प्रदेशच्या गुंटूर येथील खासदार आहे. याशिवाय ते अमारा राजा समुहाचे व्यवस्थापकीय संचालकदेखील आहेत. 4 / 9जगमोहन रेड्डी : वीएसआर काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष जगमोहन रेड्डी 416 कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. 5 / 9सावित्री जिंदाल : सावित्री ओपी जिंदाल ग्रुपच्या सह-संस्थापक आणि काँग्रेस पार्टीच्या आमदार आहेत. त्यांच्याजवळ 436 कोटी रुपयांची संपत्ती आहे. नुकतंच फोर्ब्सकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जगभरातील श्रीमंतांच्या यादीमध्ये त्यांचे नाव 176व्या क्रमांकावर होते.6 / 9नवीन जिंदाल : नवीन जिंदाल हे जिंदाल स्टील ग्रुपचे अध्यक्ष आहेत. नवीन यांच्याकडे 308 कोटी रुपयांची संपत्ती आहे. 7 / 9अनिल एच लाड : अनिल एच लाड हे कर्नाटकातील काँग्रेसेचे आमदार आहेत. यापूर्वी ते राज्यसभेचे खासदारदेखील होते. त्यांनी आपली एकूण संपत्ती 289 कोटी रुपये एवढी असल्याची घोषित केली आहे. 8 / 9राजकुमार धूत : शिवसेनेचे नेते राजकुमार धूत राज्यसभेचे खासदार आहेत. 280 कोटी रुपये एवढी त्यांची संपत्ती आहे. 9 / 9नामा नागेश्वर राव : तेलुगू देसम पार्टीचे नेते नामा नागेश्वर राव 16 व्या लोकसभेचे सदस्य आहेत. राजकारणात येण्यापूर्वी नागेश्वर Infrastructure company Madhucon Project चे कार्य सांभाळत होते. ते 174 कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications