शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दिल्ली-एनसीआरमधील प्रदूषण आतापर्यंतच्या धोकादायक पातळीवर, शाळांना सुट्टी देण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2017 7:58 PM

1 / 8
दिल्ली आणि एनसीआर येथे राहणा-या नागरिकांचं आयुष्य हानीकारक हवा प्रदूषणामुळे जवळपास 6 वर्षांनी कमी झालं आहे.
2 / 8
एनबीटीने दिलेल्या वृत्तानुसार, राजधानी दिल्लीमधील प्रदूषण आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचलं आहे.
3 / 8
येथील हवा इतकी विषारी झालीये की एनसीआरच्या नोयडा आणि गाझियाबादमध्ये एअर क्वालिटी इंडेक्स 400 च्या वर पोहोचला आहे.
4 / 8
जर एअर क्वालिटी इंडेक्स 450 च्या वर गेला तर लहान मुलांच्या शरीरासाठी ते अत्यत हानीकारक होऊ शकतं, त्यामुळे कदाचीत काही दिवस शाळांना सुट्टी द्यावी लागू शकते.
5 / 8
दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदूषण कंट्रोल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने यावर्षी दिवाळीत फटाकेबंदी लागू केली होती.
6 / 8
लॅन्सेट नियतकालिकेने गेल्या महिन्याच्या अहवालात भारतामध्ये प्रदूषणामुळे दर वर्षी 25 लाख जणांचा मृत्यू होतो असं म्हटलं होतं.
7 / 8
त्यापैकी 18 लाख व्यक्तींचा हवेच्या प्रदूषण आणि त्यामुळे होणाऱ्या आजारांमुळे मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती दिली होती.
8 / 8
पाण्यात होणाऱ्या प्रदूषण अथवा दूषित पाण्यामुळे ६ लाख ४० हजार जणांचा मृत्यू होतो. संपूर्ण जगात हवेच्या प्रदूषणामुळे मृत्युमुखी पावणा-यांमध्ये भारताचा पहिला क्रमांक लागतो.
टॅग्स :pollutionप्रदूषणNew Delhiनवी दिल्ली