शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Ponguleti Srinivas Reddy: इकडे शिवसेना, तिकडे केसीआर! भाजपाने तेलंगानात सुरुंग लावला; शिंदेंसारखा म्होरक्या फोडला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 2:15 PM

1 / 8
महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचा अंत काही होत नसताना तिकडे तेलंगानामध्ये भाजपाने केसीआर यांच्या बीआरएसला मोठा सुरुंग लावला आहे. बीआरएस नेते आणि खम्ममचे माजी खासदार पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी भाजपाच्या वाटेवर आहेत. १८ जानेवारीला ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत.
2 / 8
रेड्डी आणि शाह यांच्या भेटीमुळे केसीआरच्या अडचणी वाढू शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. श्रीनिवास रेड्डी यांना आपल्या गोटात आणण्यात भाजपला यश आले, तर राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता भाजपसाठी ही मोठी उपलब्धी ठरू शकते.
3 / 8
या महिन्याच्या 16 आणि 17 तारखेला राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर ते भाजप नेतृत्वाची भेट घेणार आहेत.श्रीनिवास रेड्डी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती.
4 / 8
राज्य पक्षप्रमुख बंदी संजय यांची पदयात्रा खम्मममध्ये येणार होती. श्रीनिवास रेड्डी यांना पक्षप्रवेश देण्यासाठी जाहीर सभाही घेतली जाणार होती. परंतू, काही कारणांमुळे ती होऊ शकली नाही. त्यानंतरही भाजपने प्रयत्न सुरु ठेवले होते.
5 / 8
बीआरएसमध्ये पद असले तरी आपल्याला लोकांचा मजबूत पाठिंबा आहे, असे वक्तव्य त्यांनी कार्यकर्त्यांच्या सभेत केले होते. यानंतर त्यांची सुरक्षा कमी करण्यात आली होती. यानंतर त्यांनी पुन्हा पुढील विधानसभा निवडणुकीत 'कुरुक्षेत्र' मधून लढतील आणि अविभाजित खम्मम जिल्ह्यात समर्थकांच्या अपेक्षा पूर्ण करतील असे वक्तव्य केले होते.
6 / 8
2014 च्या संसदीय निवडणुकीत खम्मममधून श्रीनिवास रेड्डी हे एकमेव YRSCP खासदार होते. त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. दिवंगत वायएस राजशेखर रेड्डी यांच्या कुटुंबाशी असलेल्या त्यांच्या जवळच्या संबंधांमुळे ते वायएसआरटीपीमध्ये जाऊ शकतात असेही बोलले जात होते. मात्र, त्यांनी त्यांनी 2018 च्या विधानसभा आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बीआरएस उमेदवारांना पाठिंबा दिला होता.
7 / 8
रेड्डी यांच्या पक्षप्रवेशाबाबत भाजपने अवाक्षरही काढलेले नाहीय. पक्षाचे प्रभारी सुनील बन्सल स्वत: त्यांच्या संभाव्य प्रवेशावर लक्ष ठेवून असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. खम्मममधील आणखी एक माजी बीआरएस मंत्री भाजपमध्ये सामील झाल्याच्या अफवा उडाल्या आहेत.
8 / 8
भाजपच्या जॉइनिंग कमिटीमध्ये काम करणाऱ्या एका नेत्याने सांगितले की, 'संक्रांतीनंतर आणखी पक्षप्रवेश होतील असे आम्ही नक्कीच म्हणू शकतो. जर श्रीनिवास रेड्डी आमच्या पक्षात सामील झाले तर आमच्यासाठी ती मोठी उपलब्धी असेल कारण आमची तेथे उपस्थिती नाही. यापेक्षा अधिक काही सांगता येणार नाही.
टॅग्स :TelanganaतेलंगणाBJPभाजपाAmit Shahअमित शाह