postman plying 15 km through the forest in tamilnadu D sivan
ना पगारवाढ, ना बदलीसाठी अर्ज, जंगलातून 15 किमीची पायपीट करणारा पोस्टमन By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 4:37 PM1 / 11तामिळनाडूतील पोस्टमन डी सिवन यांचं प्रत्येकजण कौतुक करतंय. कुनूर या दुर्गम भागात, जिथं लोकांपर्यंत कुठलिही सुविधा पोहोचली नाही. आधुनिक भारतापासून कोसो दूर असलेल्या, मजदुरी करणाऱ्या लोकांसाठी वाहकाचे काम करण्याचं कर्तव्य डी. सिवन बजावत होते.2 / 11तामिळनाडूतील हे प्रसिद्ध पोस्टमन डि. सिवन गेल्याच आठवड्यात निवृत्त झाले. आपल्या सेवाकाळातील असाधारण कर्तव्य परायणेतमुळे ही सर्वसामान्य व्यक्ती असामान्य बनली आहे. 3 / 11कुनूरच्या घनदाट जंगलातून, डोंगररांगातून मार्ग काढत लोकांपर्यंत पत्र पोहोचविण्याचं काम करत होते. विशेष म्हणजे या डोंगराळ प्रदेशात गाडी तर दूरच पण सायकलही जात नसत. 4 / 11घनदाट जंगलातून मार्ग काढत दररोज 15 किमीची पायपीट डि सिवन करत. कधी जंगली हत्ती त्यांचा पाठलाग करत तर कधी समोरच अस्वल दिसतं5 / 11तरीही सिवन यांनी आपल्या कर्तव्यात कामचुकारपणा केला नाही, अनेकदा अस्वलांनी त्यांचा पाठलाग केला. मात्र, जीवावर उदार होऊन त्यांनी तब्बल 30 वर्षे आपली ड्युटी केली. 6 / 11मी पोस्ट विभागात नोकरी नाही, तर ड्युटी म्हणजे कर्तव्य करत असल्याचे ते म्हणत. माझ्या कामात मला आनंद मिळायचा, असेही त्यांनी म्हटले. 7 / 11जोपर्यंत मी जिवंत आहे, किंवा सेवानिवृत्त होत नाही, तोपर्यंत मी माझी ड्युटी करणारच, असे ते नेहमी म्हणत. कुटुंबीयांना त्यांची सातत्याने काळजीही लागलेली असत. 8 / 11निलगिरी पर्वत रांगातील रेल्वे ट्रॅकवरुन त्यांची दररोज पायपीट असत. बुरिलियारजवळील सिंगार एस्टेटनवरील जंगलानजीक राहणाऱ्या बागान मजुरांपर्यंत पत्र पोहचिवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. 9 / 11सिवन यांना आपल्या या प्रवासात जंगली प्राण्यांसह गजड भोगदेही पार करावे लागत. या भोगद्यांमध्ये मोठा काळोख असायचा. तरीही न घाबरता ते एकटेच या भोगद्यातून पार होत. 10 / 11वयाच्या 65 व्या वर्षी सिवन हे सेवानिवृत्त झाले. त्यांना केवळ 12 हजार रुपये प्रतिमाह वेतन मिळत. मात्र, कधीही त्यांनी कमी वेतनाची तक्रार केली नाही किंवा बदलीसाठी अर्जही दिला नाही. 11 / 11सनदी आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी डी. सिवन यांचा फोटो शेअर करत, त्यांच्या निवृत्तीसंदर्भात माहिती दिली. तसेच, त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचं कौतुकही केलंय. आणखी वाचा Subscribe to Notifications