pradhan mantri awas yojana 2021 centre approves 56368 new houses
PM Awas : 56 हजारहून अधिक लोकांना मिळणार नवीन घरे, मोदी सरकारने दिली मंजुरी By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 2:40 PM1 / 10Pradhan Mantri Awas Yojana 2021: स्वत:चे एक घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. अशा लोकांसाठी एक चांगली बातमी आहे. स्वस्त घर खरेदी करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरे बांधण्यास परवानगी दिली आहे. 2 / 10पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 56368 नवीन घरे बांधण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. Central Sanctioning and Monitoring Committee च्या 53 व्या बैठकीला ही मंजुरी देण्यात आली. 3 / 10गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने 2022 पर्यंत देशातील सर्व लाभार्थ्यांना पक्की घरे देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या बैठकीत 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.4 / 10केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कार्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी सांगितले की, सन 2022 पर्यंत एक कोटी 12 लाख घरांच्या मागणीपैकी आतापर्यंत सुमारे एक कोटी 11 लाख घरांना मंजुरी मिळाली आहे. 5 / 10याचबरोबर, 73.10 लाख घरांचे पायाभूत काम पूर्ण झाले असून 42.70 लाख घरे लाभार्थ्यांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती हरदीपसिंग पुरी यांनी दिली.6 / 10दरम्यान, मोदी सरकारने 2022 पर्यंत देशातील सर्व कुटुंबांना पक्के घर देण्याचे आश्वासन दिले आहे. सरकारची ही योजना 25 जून 2015 रोजी सुरू झाली. 7 / 10या योजनेंतर्गत एक कोटी घरे बांधण्याचे सरकारने लक्ष्य केले आहे, मात्र, सध्या सरकार ज्या वेगाने काम करत आहे, ते पाहता हे लक्ष्य 2022 पूर्वी पूर्ण होईल असे म्हटले जाते.8 / 10या बैठकीत लाइट हाऊस प्रोजेक्ट्स (LHPs) आणि डेमोन्सट्रेशन हाऊसिंग प्रोजेक्ट्सच्या (DHPs) कामांचा आढावा घेण्यात आला. लाइट हाऊस प्रोजेक्ट्सचा पाया 1 जानेवारी 2021 रोजी पंतप्रधान मोदींनी घातला. 9 / 10एलएचपीअंतर्गत लखनौ, रांची, राजकोट, अगरतला, चेन्नई आणि इंदूरमध्ये घरे बांधली जात आहेत. याचबरोबर, केंद्र सरकारने एलएचपींसाठी ऑनलाईन नोंदणी मोहीम देखील सुरू केली आहे. 10 / 10यामुळे सरकार लोकांसाठी तांत्रिक जागरूकता, सहभाग, साइटवर शिकणे, समाधानासाठी उपाय शोधणे, प्रयोग आणि नावीन्यपूर्ण गोष्टींना प्रोत्साहन देणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications