शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

PM Kisan Scheme : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले ९३ हजार कोटी; अशाप्रकारे करू शकता अर्ज

By ravalnath.patil | Published: September 22, 2020 12:58 PM

1 / 12
नवी दिल्ली : मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. देशातील ११ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ९३ हजार कोटी पाठविले आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सरकारने इतकी मोठी रक्कम थेट शेतकऱ्यांसाठी दिली आहे.
2 / 12
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Scheme) माध्यमातून हे शक्य झाले आहे. या योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर २०१८ मध्ये केली होती.
3 / 12
केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, यावर्षी नोव्हेंबरपर्यंत एकूण मदतीची रक्कम एक लाख कोटींपेक्षा जास्त होईल. कारण, पैसे पाठविण्याचे काम चालू आहे.
4 / 12
विशेष म्हणजे, कोणताही शेतकरी कधीही नोंदणी करून या योजनेचा लाभ घेऊ शकतो. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला वर्षाकाठी सहा हजार रुपयांची मदत दिली जाते.
5 / 12
गेल्या दीड महिन्यांत ८.८० कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये पाठविण्यात आले आहेत. कोरोना संक्रमण काळातही या योजनेची रक्कम शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी ठरली आहे.
6 / 12
हे सर्व पैसे शेतकऱ्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी) मार्फत पाठविले जात आहेत, जेणेकरुन यावर भ्रष्टाचारी नेते आणि नोकरशहांची नजर पडत नाही.
7 / 12
देशातील सर्व १४.५ कोटी शेतकरी कुटुंबांना पैसे देण्यात येणार आहेत. परंतु या योजनेत सर्व पडताळणी झालेली नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकेल, यासाठी मोदी सरकारने ही योजना सुरू केली आहे.
8 / 12
पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत महसूल रेकॉर्डमध्ये ज्यांचे नाव नोंदवले गेले आहे, ती कोणताही प्रौढ व्यक्ती स्वतंत्रपणे या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
9 / 12
याचा अर्थ असा की जर एकापेक्षा जास्त प्रौढ सदस्याचे नाव समान शेतीच्या जमीनीच्या कागदपत्रात नोंदवले गेले असेल तर प्रत्येक प्रौढ सदस्याला योजनेअंतर्गत स्वतंत्र लाभ मिळू शकेल. जरी तो संयुक्त कुटुंबात राहत असेल. यासाठी महसूल नोंदी व्यतिरिक्त आधार कार्ड आणि बँक खाते क्रमांक आवश्यक असेल.
10 / 12
योजनेंतर्गत आपण घरी ऑनलाईन अर्ज (नोंदणी) करू शकता. यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी किंवा त्यामध्ये काही बदल करण्यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाइटवरून करता येणार आहे.
11 / 12
यासाठी प्रथम www.pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. वेबसाइटच्या पहिल्या पानावर, फार्मर्स कॉर्नर उजव्या बाजूला मोठ्या अक्षरे लिहिलेले आहे.
12 / 12
आपले नाव सूचीमध्ये आहे की नाही हे आपण पाहू इच्छित असल्यास आपल्याला लाभार्थी यादी / Beneficiary list वर क्लिक करावे लागेल. यानंतर आपण आपले नाव राज्य, जिल्हा, उपजिल्हा, गट आणि गाव यांचे नाव भरून तपासू शकता.
टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदी