Pragyananda's Chess set in front of PM, pragya met Modi with his parents
प्रग्यानंदाचा PM समोर बुद्धीबळाचा सेट, आई-वडिलांसह घेतली मोदींची भेट By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 8:13 PM1 / 10अझरबैजान येथे जागतिक बुद्धीबळ स्पर्धेत भारताच्या १८ वर्षीय प्रज्ञानंद याला हरवून मॅग्नस कार्लसन जगज्जेता ठरला. मात्र, प्रज्ञानंदने उपविजेता पदाचा खिताब जिंकत जागतिक क्रमवारीत दुसर्या क्रमांकाचा बुद्धीबळपटू म्हणून देशाचा गौरव केला आहे.2 / 10अझरबैजान येथून प्रग्यानंद बुधवारी मायदेशी परतला. त्यावेळी, चेन्नई विमानतळावर त्याच्या स्वागतासाठी चाहत्यांनी, नातेवाईकांनी आणि माध्यम प्रतिनिधींनी मोठी गर्दी केली होती.3 / 10राज्य क्रीडा विभागाचे अधिकारीही प्रग्यानंदच्या स्वागताला चेन्नई विमानतळावर पोहोचले होते. तामिळनाडूतील करगट्टम आणि ओयिलट्टम या लोकनृत्यासह फुलांच्या पायघड्या घालून त्याचं स्वागत झालं. 4 / 10प्रग्यानंदने आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. पंतप्रधानांनी आणि प्रग्यानेही या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. 5 / 10पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटण्याचा मोठा सन्मान आज मिळाला. सर, मला आणि माझ्या आई-वडिलांना प्रेरणादायी आणि ऊर्जात्मक मार्गदर्शन केल्याबद्दल आपला आभारी आहे, असे ट्विट प्रग्यानंदाने केलं आहे.6 / 10प्रग्यानंदाच्या भेटीचे फोटो शेअर करत पंतप्रधान मोदींनीही प्रग्याच्या ट्विटला उत्तर दिलंय. आज एका खास व्यक्तीची भेट झाली. प्रग्या तुला आणि तुझ्या कुटुंबाला भेटून खूप आनंद झाला.7 / 10तू उत्कंठा आणि चिकाटी दर्शवितो. भारतातील तरुण इतर क्षेत्रातही स्पर्धा करू शकतात याचं उदाहरण तू दाखवून दिलंय. तुझा अभिमान वाटतो, असेही मोदींनी प्रग्यानंदाबद्दल म्हटलंय.8 / 10विशेष म्हणजे जागतिक बुद्धीबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेला तो वयाने सर्वात लहान खेळाडू ठरला आहे. त्याच्या या जगजेत्तेपदाच्या स्वप्नाचं कौतुक करत उद्योगपती आनंद महिंद्रांनी मोठी घोषणा केली होती.9 / 10आई-वडिलांनी आपल्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. म्हणून, मी प्रज्ञानंद ऐवजी त्याच्या आई-वडिलांना XUV 400 ही कार गिफ्ट देऊ इच्छितो, असे म्हणत त्यांनी प्रग्यानंदला कार देऊ केली आहे. 10 / 10प्रग्यानंदचे देशभरातून कौतुक होत असून बुद्धीबळ खेळातील भारतीयांना त्याने प्रोत्साहित केलं आहे. प्रग्यामुळे बुद्धीबळ क्रीडा प्रकारालाही देशात महत्त्व आलंय. आणखी वाचा Subscribe to Notifications