शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Pranab Mukherjee: प्रणव मुखर्जींची ती सवय, जी बनली होती त्यांची ओळख

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 10:50 PM

1 / 7
देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच आज निधन झालं. त्यांच्या जाण्याने देशाच्या राजकारणात आदरयुक्त दरारा असणारा दिग्गज राजकारणी काळाच्या पडद्याआड गेला आहे. प्रणव मुखर्जी यांचे नेतृत्वगुण आणि त्यांच्या सवयी एकेकाळी चर्चेचा विषय ठरल्या होत्या. प्रणव मुखर्जींच्या या सवयीचा घेतलेला हा आढावा.
2 / 7
प्रणव मुखर्जींना पोल्टू दा या नावानेही ओळखले जात असे. प्रणव मुखर्जींना पाईप पिण्याची आवड होती. त्यांची ही सवय राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरायची. मात्र माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना मात्र प्रणव मुखर्जींची ही सवय अजिबात आवडत नसे.
3 / 7
प्रणव मुखर्जी यांना काँग्रेसचे तत्कालीन दिग्गज नेते देवकांत बारुआ यांनी सर्वप्रथम पाईप पिण्यास दिला होता. तेव्हापासूनच त्यांना पाईप पिण्याची सवय लागली होती.
4 / 7
प्रणव मुखर्जी तेव्हा मोठ्या आवडीने पाईप प्यायचे. मात्र इंदिरा गांधींना त्यांची ही सवय अजिबात आवडत नसे. त्यांना या पाईपमधून निघणाऱ्या धुराचा त्रास व्हायचा.
5 / 7
प्रणव मूखर्जींना गोपनीय बाबी गुपित ठेवायची सवय होती. त्यामुळे प्रणव मुखर्जींना कुणी काहीही सांगो. पण त्यांच्या तोंडातून धुराशिवाय काहीही निघणार नाही, असे इंडिया गांधी म्हणायच्या.
6 / 7
वाढत्या वयात प्रणव मुखर्जी यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पाईप पिणे बंद केले होते. मात्र ते फार काळ ही सवय टाळू शकले नाहीत. नंतर ते निकोटिन रहीत पाईप पिऊ लागले.
7 / 7
दरम्यान, राष्ट्रपती पदावर असताना प्रणव मुखर्जी यांना तब्बल ५०० पाईप भेट म्हणून मिळाले होते. प्रणव मुखर्जी यांनी हे पाईप नंतर राष्ट्रपती भवनातील संग्रहालयाला दान दिले होते.
टॅग्स :Pranab Mukherjeeप्रणव मुखर्जीPoliticsराजकारणIndiaभारत