prashant kishor guarantee jan suraj party bihar elections 2025 bjp jdu rjd
Prashant Kishor : "जो लढेल, तो जिंकेल!", प्रशांत किशोर यांच्या 'गॅरंटी'मुळं कोणाचं टेन्शन वाढलं? By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2024 4:51 PM1 / 6बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जन सुराजचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी आणखी एक मोठं निवेदन जारी केलं आहे. त्यामुळे राज्यातील प्रमुख पक्षांमधील तणाव वाढताना दिसून येत आहे. 2 / 6प्रशांत किशोर यांनी गुरुवारी (०१ ऑगस्ट) एक निवेदन जारी केलं आहे. यामध्ये २०२५ मध्ये बिहारमध्ये जन सुराजचं सरकार स्थापन होईल. पुढची विधानसभा जन सुराजनं भरलेली असेल.3 / 6निवडणूक लढवली तर पराभव होऊ देणार नाही, जो निवडणूक लढवेल, तो जिंकणार असा दावाही करण्यात आला आहे. तसंच, विधानसभेच्या सर्व २४३ जागांवर जन सुराज स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं प्रशांत किशोर यांनी सांगितलं आहे. 4 / 6पक्षाचा नेता कोण असेल हे जनताच ठरवेल, असंही ते म्हणाले आहेत. जन सुराज हा पक्ष प्रशांत किशोर किंवा कोणत्याही जातीचा किंवा कोणत्याही कुटुंबाचा किंवा व्यक्तीचा नसून बिहारच्या लोकांचा असेल, जे मिळून ते तयार करतील, असंही प्रशांत किशोप यांनी स्पष्ट केलं आहे.5 / 6याचबरोबर, प्रशांत किशोर म्हणाले की, जन सुराज रोजगाराची हमी देणार आहे. यात काही शंका ठेवू नाही. यासाठी एक वर्षापेक्षा जास्त वेळ लागणार नाही.6 / 6दरम्यान, बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जन सुराजचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी केलेल्या दाव्यांमुळे राजकीय वातावरण तापले असून राज्यातील प्रमुख पक्षांमधील तणाव वाढत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications