Prime Minister Modi paid a courtesy call on the Queen of Denmark
PM Narendra Modi Europe Visit: पंतप्रधान मोदींनी घेतली डेन्मार्कच्या महाराणीची भेट, असं झालं स्वागत By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2022 4:47 PM1 / 6पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डेन्मार्कच्या महाराणीच्या शासनकाळाच्या गोल्डन जुबिलीच्या निमित्ताने त्यांना सन्मानित केले. डेन्मार्कमधील राजेशाही ही जगातील सर्वात जुन्या राजेशाहींपैकी एक आहे. ८२ वर्षीय महाराणी १९७२ पासून डेन्मार्कच्या राजघराण्याशी संबंधित आहेत. 2 / 6पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या तीन दिवसीय युरोप दौऱ्यादरम्यान, मंगळवारी डेन्मार्कला भेट दिली. तेथे त्यांनी आपले समकक्ष असलेल्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांची भेट घेऊन अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. त्यानंतर मोदींनी कोपनहेगन येथे किंग्डम ऑफ डेन्मार्कच्या महाराणी मार्गारेट द्वितीय यांची भेट घेतली. यावेळी महाराणींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं थाटात स्वागत केलं. 3 / 6परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी याची माहिती देताना एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी काही फोटोसुद्धा शेअर केले आहेत. डेन्मार्कच्या महाराणी मार्गारेट द्वितीय यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसत आहेत. 4 / 6अरिंदम बागची यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींनी महाराणीच्या शासनकाळाच्या सुवर्णकाळाच्या औचित्याने त्यांना सन्मानित केले. 5 / 6 अनेक युरोपियन राजघराण्यांप्रमाणे महाराणी एलिजाबेथ द्वितीय आणि डेन्मार्कच्या राणी मार्गारेट ह्या संबंदित आहेत. त्यांचा संयुक्त वंश त्यांना यूकेच्या राणी व्हिक्टोरिया आणि डेन्मार्कचे राजे ख्रिश्चियन नववे यांच्याशी जोडतो. 6 / 6महाराणी एलिजाबेथ द्वितीय आणि डेन्मार्कच्या राणी मार्गारेट युरोपच्या एकमेव सार्वभौम राण्यांपैकीा एक आहे. कारण दोघींनाही सिंहासन वारशाने मिळाले आहे. मार्गारेट १९७२ मध्ये वडिलांच्या उत्तराधिकारी बनल्यानंतर सिंहासनावर विराजमान झाल्या. तर महाराणी एलिजाबेथ द्वितीय ह्या १९५२ मध्ये वडील किंग जॉर्ज यांच्या मृत्यूनंतर सिंहासनावर बसल्या. आणखी वाचा Subscribe to Notifications