शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान
  • महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
  • एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
  • बिटकॉइन घोटाळ्यातील ऑडिओ क्लिपमध्ये आवाज सुप्रिया सुळे आणि पटोलेंचाच; अजित पवारांचा दावा
  • पुणे जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत २९.०३ टक्के मतदान.
  • गडचिराेली - मुलचेरा तालुक्यात १११ वर्षांच्या आजीने प्रत्यक्ष बुथवर जाऊन केले मतदान
  • केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
  • Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
  • झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
  • दुपारी दीड वाजेपर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यात सरासरी 32 टक्के मतदान
  • लातूर जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३३.२७% मतदान
  • महाविकास आघाडीमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघाचे उमेदवार केदार दिघे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
  • सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी एकूण २९.४४% मतदान झालेले आहे
  • सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
  • PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
  • रत्नागिरी जिल्ह्यात मतदानाला उत्साही सुरुवात, ११ वाजेपर्यंत २२.९३ टक्के मतदान
  • कोल्हापुरातील शिरोलीत भगवी टोपी घालण्यावरुन हिंदूत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात वाद
  • हर्षवर्धन पाटील यांनी बावडा येथे सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
  • भुसावळ रेल्वे विभागाच्या डीआरएम इति पांडेय यांनी भुसावळ येथील डी.एस. हायस्कूल केंद्रात मतदानाचा हक्क बजावला.
  • आमदार राजू कारेमोरे त्यांच्या पत्नी रंजिता कारेमोरे व मुलगी वैभवी व वैभव सहकुटुंब त्यांची मूळ गाव एकलारी येथील मतदान केंद्रावर मतदान करताना.
  • ठाणे जिल्ह्यात ११ वाजेपर्यंत १६.६३ टक्के मतदान
  • केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्नी मोनिका आणि कन्या सिद्धी यांच्यासमवेत कोथरूड येथील एमआयटी स्कुलमध्ये मतदानाचा हक्क बजावला.
  • १०३ वय वर्ष असणारे स्वातंत्र्यसैनिक जी.जी. पारिख यांनी मलबार हिल मतदार संघात मतदानाचा हक्क बजावला.
  • मुलुंड म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या प्रणव पालवे (२१) या तरुणाने दोन्ही डोळ्यांनी दिसत नसतानाही पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला.
  • ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व त्यांच्या पत्नी साधना महाजन यांनी जामनेर येथील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला.
  • अकोला जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १६.३४ टक्के मतदान!
  • विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण-डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाणे येथील वागळे इस्टेट येथील एलिमेंट आयटी पार्क येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.
  • सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात सकाळी सात ते अकरा या वेळेत 15.66% मतदान झालेले आहे.
  • दुसऱ्या सत्रात नाशिकमध्ये वाढला मतदानाचा टक्का
  • ठाणे - येणारे सरकार पूर्णपणे महायुतीचं, बहुमताचं असेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मतदानानंतर प्रतिक्रिया.
  • नाशिक : जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १८.८२ टक्के मतदान. शहरात सर्वाधिक मध्य मतदारसंघात १८.४२टक्के मतदान. जिल्ह्यात दिंडोरी मतदारसंघात २६.४१टक्के तर मालेगाव मध्यमध्ये २२.७६ टक्के मतदान.
  • रायगड जिल्हा ७ विधानसभा मतदारसंघ सकाळी ७ ते ११ या कालावधीत २०.४०% मतदान
  • कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात ११ वाजेपर्यंत १८.२२ टक्के मतदान झाले.
  • सकाळच्या दोन तासांत नाशिक शहरात सरासरी ६ टक्के मतदान
  • अकोल्यात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी मतदान केंद्राची पाहणी करीत, मतदान प्रक्रियेची माहिती घेतली. ज्येष्ठ मतदारांशी संवाद साधला!
  • वर्सोवा विधानसभेच्या महायुतीच्या उमेदवार डॉ.भारती लव्हेकर यांनी आज सकाळी चार बंगला येथील ग्यान केंद्र शाळेत मतदानाचा हक्क बजावला.
  • नितीन गडकरी यांनी सहपरिवारासोबत टाऊन हॉल महाल येथे मतदानाचा हक्क बजावला.
  • जळगाव : पळासखेड ता. भडगाव येथे सकाळी १०.३० वाजेपर्यंत १८००पैकी ३०जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
  • पोलीस आयुक्त मुंबई विवेक फणसळकर यांनी बजावला मतदानाचा अधिकार
  • तिरोडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहांगडाले व गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी कुटुंबीयांसह बजाविला मतदानाचा अधिकार.
  • विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
  • राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी बजावला मतदानाचा अधिकार
  • नांदेड: रवी नगर भागात एक तासापासून ईव्हीएम बंद आहे, मतदार प्रतीक्षेत, दोन मशीनमध्ये झाला बिघाड, १८२ मतदान केंद्र क्रमांक
  • सोलापूर : सोलापुरातील सर्वच मतदान केंद्रावर मतदानास प्रारंभ; बूथ प्रमुख, नेतेमंडळी व पक्षाच्या प्रमुखांसोबत कार्यकर्त्यांचे मतदान सुरू

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ‘हे’ 25 जबरदस्त निर्णय; तुम्हीही म्हणाल ‘मोदी है तो मुमकिन है!’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 6:41 PM

1 / 17
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा आज 72 वा वाढदिवस आहे. भाजपा नेते आणि मोदी समर्थक आज मोठ्या उत्साहात त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी जे काही धडाकेबाज निर्णय घेतले त्या निर्णयांची चर्चा वाढदिवसानिमित्त सुरू आहे. मोदींनी आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात जे ऐतिहासिक निर्णय घेतले त्यामुळे देशात त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
2 / 17
आज आम्ही तुम्हाला मोदींच्या अशा 25 निर्णयांबद्दल सांगणार आहोत. ज्या निर्णयाची केवळ देशानेच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील नोंद घेण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यापासून ते आतापर्यंत घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांबद्दल जाणून घेऊया...
3 / 17
5 ऑगस्ट 2019 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम 370 हटवण्यात आल्याची घोषणा केली. याचबरोबर काश्मीरचे विशेष अधिकार देखील संपुष्टात आले. कलम 370 हा भाजपाच्या जाहीरनाम्यामधील मुख्य विषय होता. इंडिया गेटवर असलेल्या अमर जवान ज्योतीचे विलिनीकरण राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ज्योतीमध्ये करण्यात आले.
4 / 17
देशात भाजपाचे सरकार सत्तेत येताच अर्थसंकल्पाची तारीख देखील बदलण्यात आली. मोदी सरकार येण्यापूर्वी अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटच्या तारखेला सादर होत होता. मात्र ती तारीख बदलण्यात आली. आता अर्थसंकल्प एक फेब्रुवारी रोजी सादर करण्यात येतो.
5 / 17
मोदींनी आपल्या कार्यकाळात घेतलेला सीएए, एआरसी हा एक महत्त्वपूर्ण निर्णय मानला जातो. 10 जानेवारी 2020 रोजी देशात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्यात आला. या कायद्याद्वारे शेजारच्या देशातून भारतात आलेल्या बिगर मुस्लिम स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र या निर्णयामुळे मोठा वाद निर्माण झाल्याचे पहायला मिळाले.
6 / 17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळून दिली. मोदींच्या प्रयत्नामुळे 21 जून 2015 पासून 21 जून हा जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. पंतप्रधान मोदींनी जलशक्ती मंत्रालयाची निर्मिती केली. जलसंपदा, पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाचे विलीनीकरण करून जलशक्ती मंत्रालयाची निर्मिती करण्यात आली आहे.
7 / 17
पुलवामामध्ये भारतीय सैनिकांवर हल्ला झाला होता, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालाकोट एअर स्ट्राइकचा निर्णय घेतला. 26 फेब्रुवारी 2019 रोजी भारतीय सेनेने बालाकोट एअर स्ट्राइक घडवून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले.
8 / 17
नोटबंदी हा पंतप्रधान मोदींचा एक ऐतिहासिक निर्णय मानला जातो. देशातील काळा पैसा नष्ट करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदीचा निर्णय घेतला. नोटबंदीनंतर चलनात असलेल्या जुन्या 500 आणि 1000 च्या नोटा बंद करण्याची घोषणा करण्यात आली.
9 / 17
मोदी सरकारने 1 एप्रिल 2020 रोजी बँकांच्या विलीनीकरणाची घोषणा केली. ज्या अतंर्गत 10 सरकारी बँकांचे विलीनीकरण 4 मोठ्या सरकारी बँकांत करण्याचा निर्णय घेण्यात आला. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता. त्याला अटकाव घालण्यासाठी मोदींकडून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती.या निर्णयाकडे त्या काळातली एक महत्त्वाची गरज म्हणून पाहिलं जातं.
10 / 17
दिल्लीच्या रेस कोर्स रोडचे नाव बदलून लोक कल्याण मार्ग असे करण्यात आले. अपंग या शद्वाऐवजी दिव्यांग असा शद्ब वापरण्याचा निर्णय भाजपा सरकारने घेतला. या निर्णयाचे सर्वस्तरातून कौतुक झाले.
11 / 17
सेंट्रल व्हिस्टा हा मोदींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पातंर्गत 20,000 कोटी रुपये खर्च करून, संसदेच्या नव्या इमरातीची उभारणी करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकिस्तानला चांगलाच धडा मिळाला.भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून पाकिस्तानी दहशतवादाला चोख प्रत्युत्तर दिले.
12 / 17
केंद्र सरकारने राजपथचे नाव बदलू कर्तव्यपथ असे केले. मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान निधी योजना सुरू केली. ज्या अतंर्गत ज्यांच्या नावावर जमीन आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना केंद्रामार्फत दरवर्षी 6,000 हजार रुपयांची मदत मिळते.
13 / 17
मोदी सरकारने 1 जानेवारी 2015 ला नियोजन आयोगाचे नामकरण ‘NITI’ आयोग म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असे केले. मोदी सरकारने राज्याच्या करप्रणालीत सुधारणा करत एक देश एक कर पद्धत अर्थात जीएसटी लागू केली. जीएसटीचे विभाजन केंद्र 50 टक्के आणि राज्य 50 टक्के असे करण्यात आले आहे.
14 / 17
राम मंदिराचा वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता. मात्र त्यावर तोडगा काढण्यास केंद्रातील मोदी सरकारला यश आले. जे रेशन कार्डधारक आहेत. त्यांना देशात कुठेही स्वस्त धान्य खरेदी करता यावे यासाठी केंद्र सरकारकडून वन नेशन, वन रेशन कार्ड योजना सुरू करण्यात आली.
15 / 17
अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलाच्या नवीन ध्वज चिन्हाचे अनावरण केले आहे. तीन तलाक कायदा हा देखील भाजप सरकारने घेतलेला एक महत्त्वपूर्ण निर्णय मानला जातो. या कायद्याने मुस्लीम महिलांना न्याय मिळून देण्याचे काम केले.
16 / 17
शहीद सैनिकांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी वॉर मेमोरियल उभारण्यात आले आहे.तिथे 25,942 सैनिकांची नावे सुवर्ण अक्षरात लिहिण्यात आली आहेत.मोदी सरकारच्या काळात इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
17 / 17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर एकही दिवस सुट्टी न घेता काम करण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. नरेंद्र मोदींचे नाव केवळ देशातीलच नव्हे, तर जगातील आघाडींच्या नेत्यांमध्येही सामील आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी