Prime Minister Narendra Modi directly on the ground from Delhi, on the Ladakh border
Border : पंतप्रधान थेट मैदानात, लडाख सीमारेषेवर नरेंद्र मोदी By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2020 1:22 PM1 / 12: भारतीय भूमीवर चीनने अतिक्रमण केल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या महिन्यात भारतीय सैन्यावर पाठीमागून हल्ला केला. यामध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले तर चीनचे 40 हून अधिक जवान मारले गेले.2 / 12 यानंतर दोन्ही देशांच्या सीमेवर तणावाची स्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज थेट लेह गाठत सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे.3 / 12भारत-चीन सीमारेषेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख नरवणे यांच्यानंतर सीडीएस बिपिन रावत लेह-लडाखच्या दौऱ्यावर जाणार होते.4 / 12 मात्र, मोदी यांनी अचानक भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत बिपिन रावतदेखील असून त्यांनी विमानतळावर मोदींचे स्वागत केले5 / 12 मोदींकडून चीनच्या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांची भेट घेऊन विचारपूस करण्याची शक्यता आहे. 6 / 12मोदींनी लडाखमधील निमूमध्ये अचानक दिलेल्या भेटीनंतर आयटीबीपी, हवाई दलाच्या जवानांसोबत चर्चा केली. हे ठिकाण समुद्र सपाटीपासून 11,000 फुटांच्या उंचीवर आहे. 7 / 12सिंधू नदीच्या काठावर भारतीय जवानांचा कँप आहे. मोदी चीनवर एकानंतर एक स्ट्राईक करत आहेत.8 / 12भारताच्या सरकारी कंपन्यांना ४जी कंत्राटे रद्द करण्याचे आदेश, रेल्वेला चीनच्या कंपनीसोबतचे कंत्राट रद्द करण्याचे आदेश दिले होते.9 / 12यानंतर 59 अॅपवर बंदी आणली होती. तसेच बुधवारी रशियाकडून तातडीने 33 लढाऊ विमाने मिळविण्यासाठी चर्चाही केली होती. 10 / 12यानंतर 59 अॅपवर बंदी आणली होती. तसेच बुधवारी रशियाकडून तातडीने 33 लढाऊ विमाने मिळविण्यासाठी चर्चाही केली होती. 11 / 12मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यावरुन काँग्रेसने भाजपाला लक्ष्य केले आहे. काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी इंदिरा गांधीचा फोटो शेअर करुन, आता पाहुयात मोदी काय करतात? असा प्रश्न विचारला आहे. 12 / 12 जेव्हा इंदिरा गांधी लेह भेटीला गेल्या होत्या, त्यावेळी पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते. आता, पाहुयात मोदीजी काय करतात? असा खोचक टोला काँग्रसने लगावला आहे आणखी वाचा Subscribe to Notifications