प्रियांका गांधींसोबत कार्यकर्त्यांचे फोटोसेशन; 2 तासांत 1000 कार्यकर्त्यांनी काढले फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 1:15 PM1 / 9उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये 2 दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी जवळपास 2 तास सर्व विंगसोबत फोटोसेशन केले. 2 / 9यादरम्यान, अनेक महिला फ्रंटल युवक, फ्रंटल सेवा दल आणि कार्यकर्त्यांना प्रियांका गांधी वाड्रा यांच्यासोबत फोटो काढायचे होते. त्यामुळे प्रियांका गांधींनी पार्टी ऑफिसमध्ये आलेल्या सर्व कार्यकर्त्यांसोबत फोटो काढून त्यांना खुश केले.3 / 9पीसीसी कार्यालयाच्या बंद आणि खुल्या परिसरात प्रियांका गांधी यांच्यासोबतचे हे फोटोसेशन जवळपास 2 तास चालले, ज्यात त्यांनी 1 हजारांहून अधिक कार्यकर्त्यांसोबत फोटोसाठी पोझ दिली. 4 / 9यावेळी काँग्रेसच्या सीएलपी नेत्या आराधना मिश्रा आणि प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू उपस्थित होते आणि सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि फ्रंटल विंगने प्रियांका गांधी यांच्यासोबत फोटो काढले.5 / 9प्रियांका गांधी यांनी शनिवारी सकाळी एका ट्विटमध्ये म्हटले आहे लिहिले, 'यूपी काँग्रेस कमिटी कार्यालयात राज्य निवडणूक समितीच्या बैठकीत सहभाग घेतला. यावेळी ज्येष्ठ सदस्य, युवक, महिला आणि यांच्या सहभागामुळे अतिशय फलदायी चर्चा झाली. निवडणूक समितीमध्ये संघटनेचे पदाधिकारी, प्रत्येकाचा सहभाग, प्रत्येकाची जबाबदारी या मंत्राने काँग्रेसने निवडणुकीसाठी जोरदार खेळी केली आहे.'6 / 9दरम्यान, उत्तर प्रदेश निवडणुकीत कॉंग्रेस प्रोफेशनल पद्धतीने उमेदवार उभे करण्याची तयारी करत आहे, ज्यामध्ये उमेदवारांना त्यांची क्षमता आणि लोकांमधील लोकप्रियतेच्या आधारावर वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागले गेले आहे. 7 / 9उत्तर प्रदेशातील 403 विधानसभा जागांसाठी उमेदवार उभे करण्यासाठी काँग्रेस A, B, C आणि D श्रेणींची यादी तयार करण्यात येणार आहे. ही रणनीती प्रियंका गांधींनी बनवली आहे, असे सांगण्यात येत आहे.8 / 9उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे. 2017 च्या निवडणुकीत भाजपाने येथे 403 पैकी 312 जागा जिंकल्या होत्या. सपा आणि काँग्रेसने एकत्र निवडणुका लढवली होती. 9 / 9 सपाला 47 आणि काँग्रेसला 7 जागा मिळाल्या होत्या. मायावतींच्या बसपाला 19 जागा जिंकण्यात यश आले होते. आता काँग्रेस या निवडणुकीत जोरदार पुनरागमन करण्याची तयारी करत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications