शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

काय आहे प्रोजेक्ट ७५?; भारत समुद्रात पाजणार चीन-पाकिस्तानला पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 3:12 PM

1 / 10
हिंद महासागरात चीनचा वाढता प्रभाव आणि पाकिस्तानी नौदलाला बळकट करण्यासाठी करत असलेल्या सरावाच्या पार्श्वभूमीवर भारत समुद्रात आपली ताकद वेगाने वाढवत आहे. आणखी एक आण्विक पाणबुडी आणि दोन डिझेल-इलेक्ट्रिक पारंपरिक पाणबुड्या पुढील वर्षी भारतीय नौदलात सामील होणार आहेत.
2 / 10
'प्रोजेक्ट ७५' नं वेग पकडला आहे. चला जाणून घेऊया काय आहे 'प्रोजेक्ट ७५' जो चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना समुद्रात पाणी पाजणार आहे. समुद्रात भारताला अभैद्य बनवणं आणि शत्रूच्या कुठल्याही हल्ल्याला सडेतोड उत्तर देणाऱ्या प्रकल्पाचं नाव प्रोजेक्ट ७५ आहे.
3 / 10
त्याचा पाया १९९७ मध्ये घातला गेला जेव्हा संरक्षण मंत्रालयाने त्याअंतर्गत २४ पाणबुड्या खरेदी करण्याच्या योजनेला मंजुरी दिली. पुढच्या वर्षी भारताने DCNS या फ्रेंच कंपनीकडून 4 स्कॉर्पिन श्रेणीच्या अटॅक पाणबुड्या खरेदीसाठी वाटाघाटी सुरू केल्या.
4 / 10
१९९९ मध्ये कारगिल युद्धानंतर, चीन-पाकिस्तानच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने ३० वर्षांच्या लक्ष्यासह प्रकल्प ७५ ला औपचारिक रूप दिले. या अंतर्गत २०३० च्या अखेरीस २४ पारंपरिक पाणबुड्या तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नंतर प्रोजेक्ट-75 I अंतर्गत भारतात पाणबुड्या बांधण्याची महत्त्वाकांक्षी योजना सुरू झाली.
5 / 10
प्रोजेक्ट ७५ अंतर्गत, माझगाव डॉक सबबिल्डर्स लिमिटेडने सहा डिझेल-इलेक्ट्रिक पारंपारिक स्कॉर्पीन क्लास अटॅक पाणबुड्यांना लक्ष्य केले. या प्रकल्पांतर्गत नियोजित एकूण २४ पाणबुड्यांपैकी १८ पारंपारिक आणि उर्वरित ६ अणु पाणबुड्या असतील.
6 / 10
सध्या भारताकडे सुमारे १५ पारंपारिक पाणबुड्या आहेत त्यापैकी सध्या फक्त ७ कार्यरत आहेत. याशिवाय आयएनएस अरिहंत ही आण्विक पाणबुडी आहे. भारताकडे असलेल्या पारंपारिक पाणबुड्यांमध्ये ६ जुन्या रशियन किलो-क्लास, ४ जर्मन HDW आणि ४ नवीन स्कॉर्पीन वर्गाच्या पाणबुड्या आहेत.
7 / 10
फेब्रुवारी २०१४ मध्ये अपघाताचा बळी ठरलेली INS सिंधुरत्न ही पाणबुडी लवकरच मुंबईजवळच्या समुद्रात पुन्हा तैनात होण्यासाठी सज्ज झाली आहे. या अपघातात भारतीय नौदलाचे दोन अधिकारी ठार झाले होते. आयएनएस सिंधुरत्न रशियाच्या व्वेरोडविन्स्क येथे पाठवण्यात आले होते जेथे तिला अपग्रेड करून अधिक शक्तिशाली बनवलं आहे.
8 / 10
त्याच्या अपग्रेडेशनवर सुमारे १४०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. १४००-१४०० कोटी रुपये खर्चून रशियाच्या ४ जुन्या किलो-क्लास पाणबुड्यांचे अपग्रेडेशन केले जात आहे. आयएनएस सिंधुरत्न ही दुरूस्ती केलेली दुसरी पाणबुडी होती. उर्वरित दोन्हीही दुरुस्तीनंतर लवकरच नौदलात रुजू होतील.
9 / 10
चीन हिंद महासागरात आपलं अस्तित्व वाढवत पाकिस्तानला मजबूत करत आहे त्यात ५० डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्या आणि १० आण्विक पाणबुड्या आहेत. याशिवाय ते लवकरच पाकिस्तानला आठ आधुनिक युआन दर्जाच्या पाणबुड्या पुरवणार आहेत.
10 / 10
चीन आणि पाकिस्तानचा धोका लक्षात घेऊन भारत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी आणि आपल्या सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी वेगाने काम करत आहे. नौदलाला लवकरच आणखी एक आण्विक पाणबुडी मिळणार, आणखी २ पाणबुडीची निर्मिती सुरू आहे.
टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानchinaचीन