Proud! The Indian Navy's fleet includes the powerful INS Vagir submarine
अभिमानास्पद! भारतीय नौदलाच्या ताफ्यात शक्तिशाली आयएनएस वागीर पाणबुडी दाखल By पूनम अपराज | Published: November 12, 2020 8:36 PM1 / 6केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे वागीर या पाणबुडीचे उद्घाटन केले. मुंबईतील माझगाव डॉकयार्डने शिपबिल्डर्सने ही पाणबुडी भारतीय नौदलाला सुपूर्द केली. 2 / 6भारतीय नौदलाने आपल्या ताफ्यात पाचव्या श्रेणीची पाणबुडी 'आयएनएस वजीर' सामील झाली. गुरुवारी दक्षिण मुंबईतील माझगाव डॉक येथे आयएनएसवजीर समुद्रात सोडण्यात आली. ही पाणबुडी शत्रूच्या रडारपासून बचाव करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे. 3 / 6केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या पत्नी विजया यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पाणबुडीचा शुभारंभ केला. गोवा येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नाईक या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.4 / 6वजीर पाणबुडी ही भारतात तयार होणार्या सहा काळवेरी-वर्ग पाणबुडींचा एक भाग आहे. या पाणबुडीची रचना फ्रेंच सागरी संरक्षण व ऊर्जा कंपनी डीसीएनएस यांनी केली असून भारतीय नौदलाच्या प्रकल्प 75 अंतर्गत हे काम सुरू आहे. 5 / 6अधिकारी म्हणाले की, ही पाणबुडी गुप्त माहिती गोळा करण्यास सक्षम आहेत, युद्धामध्ये प्रभावी आहे, समुद्रात सुरुंग ठेवण्यास आणि त्या भागात देखरेख ठेवण्यास देखील तितकीच सक्षम आहे.6 / 6पाणबुडीचे नाव हिंद महासागरातील शिकारी मासा 'वजीर' यावरून ठेवले आहे. पहिली वजीर पाणबुडी रशियाकडून खरेदी करण्यात आली जी 3 डिसेंबर 1973 रोजी भारतीय नौदलात दाखल झाली आणि तीन दशकांच्या सेवेनंतर 7 जून 2001 रोजी तिला सेवेतून मुक्त करण्यात आली. माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेडने (एमडीएल) प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, 'स्कॉर्पेन पाणबुड्यांचे बांधकाम एमडीएलसाठी आव्हानात्मक होते कारण कमी जागेत कामकाज सहज झाल्याने ते आव्हानात्मक बनले.' आणखी वाचा Subscribe to Notifications