Pulwama Attack : देशभरात हल्ल्याचा निषेध, पाकिस्तानचे झेंडे जाळले By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 6:38 PM
1 / 9 जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा देशभरात तीव्र निषेध नोंदवण्यात येत आहे. औरंगाबादमधील बेगमपुरा परिसरात निदर्शनं करणाऱ्यांनी पाकिस्तानचे झेंडे जाळले. 2 / 9 जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 38 जवान शहीद झाले आहेत. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंत सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. या हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. 3 / 9 जैश -ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. गुरुवारी (14 फेब्रुवारी) दुपारी दहशतवाद्यांनी पुलवामा जिल्ह्यात अवंतीपोराजवळील लाटूमोड येथे सीआरपीएफच्या ताफ्याला लक्ष्य केले. 4 / 9 या ताफ्यामध्ये एकूण 78 वाहने होती आणि या ताफ्यात 2,547 जवान प्रवास करत होते. जवानांच्या ताफ्यात दहशतवाद्याने 350 किलो आरडीएक्सने भरलेली कार घुसवली. 5 / 9 आदिल अहमद दार उर्फ वक्कास या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याने आरडीएक्सने भरलेली कार जवानांच्या ताफ्याला धडकवली. या स्फोट इतका भीषण होता की जवानांच्या बसच्या चिंधड्या उडाल्या. 6 / 9 कारद्वारे सुरक्षा जवानांच्या ताफ्याला लक्ष्य केल्याचा हा पहिलाच आत्मघाती हल्ला आहे. 7 / 9 कारद्वारे सुरक्षा जवानांच्या ताफ्याला लक्ष्य केल्याचा हा पहिलाच आत्मघाती हल्ला आहे. 8 / 9 कारद्वारे सुरक्षा जवानांच्या ताफ्याला लक्ष्य केल्याचा हा पहिलाच आत्मघाती हल्ला आहे. 9 / 9 कारद्वारे सुरक्षा जवानांच्या ताफ्याला लक्ष्य केल्याचा हा पहिलाच आत्मघाती हल्ला आहे. आणखी वाचा