punjab election 2022 aap bhagwant mann controversial divorce left wife kids for politics
पंजाबला आपलं कुटुंब मानतात भगवंत मान, ७ वर्षांपूर्वी घेतला घटस्फोट; जाणून घ्या पर्सनल लाइफ... By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 9:07 AM1 / 10भगवंत मान यांचं नाव आम आदमी पक्षाकडून पंजाबचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलं होतं. मान यांनी निवडणूक प्रचारातही खूप मेहनत घेतली. त्यांनी राजकीय क्षेत्रातील आपल्या कामासाठी त्यांनी स्वत:चं कुटुंब देखील सोडून दिलं होतं. हेच भगवंत मान आता पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. 2 / 10पंजाबची जबाबदारी पार पाडण्यासाठी सज्ज असलेल्या भगवंत मान यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. त्यांनी घेतलेल्या निर्णयांवर अनेकदा टीका देखील झाली. त्यांनी राजकीय क्षेत्राला प्राधान्य देत कुटुंबापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळ मान यांना प्रचंड ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. भगवंत मान यांच्या घटस्फोटाचही प्रकरण जाणून घेणं महत्वाचं आहे.3 / 10२०१५ साली भगवंत मान यांच्या कुटुंबात तडा गेला होता. मान यांचा त्यांची पत्नी इंदरजीत कौर यांच्यासोबत घटस्फोट झाला होता. मान यांना दोन मुलं आहेत. पण त्यांची मुलं देखील त्यांच्याशी बोलत नाहीत. याचा खुलासा खुद्द मान यांनी एका मुलाखतीत केला होता. 4 / 10त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मान यांची त्यांच्या मुलांसोबत फोनवरही बातचित होत नाही. कुटुंबाला वेळ देऊ न शकल्यानं आपण पत्नीपासून दूर गेल्याची कबुली भगवंत मान यांनी दिली होती. त्यानंतर दोघांच्या सहमतीनं घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर भगवंत मान नेहमी संपूर्ण पंजाब हेच आपलं कुटुंब असल्याचं सांगतात. 5 / 10२०१५ साली भगवंत मान यांनी त्यांच्या घटस्फोटाबाबत फेसबुकवर एक पोस्ट लिहीली होती. यात आपण राज्याला कुटुंबापेक्षा अधिक प्राधान्य देत असल्याचं नमूद केलं होतं. राजकीय क्षेत्रासाठी आपण आपल्या पत्नीपासूनही दूर राहिल्याचं त्यांनी म्हटलं होतं. 6 / 10भगवंत मान यांचा निर्णय अर्थात त्यांच्या कुटुंबीयांना मान्य नव्हता. कारण मान यांच्या राजकीय करिअरचा पाया रचण्यात त्यांच्या पत्नीचंही तितकंच महत्वाचं योगदान होतं. मान यांच्या पत्नी देखील प्रचार रॅलीत सहभागी होत होत्या. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर भगवंत मान यांना त्यांच्या पत्नीनं पाठिंबा दिला. अनेकांनी तर भगवंत मान यांनी पॉलिटिकल स्टंट करण्यासाठी घटस्फोट घेतल्याचंही म्हटलं गेलं होतं. 7 / 10भगवंत मान यांनी २०११ साली राजकारणात एन्ट्री घेतली होती. राजकारणात येण्याआधी भगवंत मान यांना सर्वांनी अनेक कॉमेडी शोमध्ये पाहिलं आहे. भगवंत मान 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'मध्येही सहभागी झाले होते. याशिवाय त्यांनी काही पंजाबी सिनेमांमध्येही काम केलं आहे. 8 / 10भगवंत मान यांनी त्यांचा पहिला कॉमेडी अल्बम जगतार जग्गी यांच्यासोबत केला होता. १० वर्ष एकत्र काम केल्यानंतर त्यांची जोडी तुटली होती. त्यानंतर मान यांची राणा रणबीर यांच्यासोबत चांगली गट्टी जमली होती. भगवंत मान यांचा कुल्फी गरमा गरम हा दुसरा कॉमेडी अल्बम तुफान हिट झाला होता. 9 / 10 भगवंत मान आता पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. 10 / 10 भगवंत मान आता पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications