राहुल गांधींनी बनवला रायता, मशरुम बिर्याणीचीही चव चाखली By महेश गलांडे | Published: January 31, 2021 1:54 PM
1 / 13 काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी हे तामिळनाडूतील वायनाड येथून निवडणूक जिंकले आहेत. त्यामुळे, आपल्या लोकसभा मतदारसंघाचा दौरा ते अधून मधून करत असतात. 2 / 13 राहुल यांनी काही दिवसांपूर्वी वायनाडचा दौरा केला, त्यावेळी तेथील व्हिलेज कुकुींग चॅनेलच्या टीमसोबत जेवणाचा आस्वाद घेतला. विशेष म्हणजे यावेळी राहुल गांधींनी रायता बनविण्यासाठी स्वत: मदत केली. 3 / 13 कुकिंग टीमसोबत बिर्याणी बनवण्यासाठी मदत करताना राहुल गांधी या टीमने त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत दिसत आहेत. 4 / 13 राहुल गांधी बिर्याणीसाठी वापरण्यात आलेल्या पदार्थांची तामिळ भाषेतील नावंही उच्चारताना या व्हिडिओत दिसत आहेत. स्थानिक आणि राहुल गांधी यांच्यात भाषेची देवाण-घेवाण व्हावी यासाठी एक महिला दुभाषी म्हणून काम करत आहे. 5 / 13 आपल्याला जेवण बनवण्याची आवड असल्याचंही राहुल गांधींनी या व्हिडिओत म्हटलंय. 'हा आमच्यासाठी मोठा दिवस आहे. राहुल गांधींनी आमची कुकिंग पाहिली आणि आम्हाला प्रोत्साहन दिलं. आज आम्ही परंपरागत रेसिपीसोबत मशरुम बिर्याण बनवली. 6 / 13 राहुल गांधींनी बिर्याणीचा रायता बनविताना स्वत: दही आणि कांदा याचं मिश्रण कालवलंय. 7 / 13 दह्याला तमिळ भाषेत काय म्हणतात, हेही त्यांनी समजून घेतलं. तसेच, दयरी म्हणजे दही म्हणत त्यांनी ती कोशिंबीर बनवली 8 / 13 मशरुन बिर्याणी तयार झाल्यानंतर याचा स्वाद अतिशय खमंग आणि भारी असल्याचं राहुल यांनी म्हटलं, त्यावेळी उपस्थितांनी राहुल यांचे आभार मानले. 9 / 13 राहुल गांधींनी येथील लोकांशी मस्त मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यावेळी एकाने मी अमेरिकेत होतो, तेव्हा अमेरिकेत माझेही मित्र असल्याचं सांगितलं. 10 / 13 बिर्याणीची चव चाखतानाही शेजारी बसलेल्या युवकासोबत तमिळ भाषेत संवाद साधण्याचा प्रयत्न राहुल यांनी केला. 11 / 13 केळीच्या पानावर व्हिलेज कुकींग युट्यूब चॅनेलच्या टीमसोबत मस्त बिर्याणीही खाल्ली, यावेळी चवीचेही कौतुक केलं. 12 / 13 बिर्याणी खाल्यानंतर हात धुताना राहुल गांधी या फोटोत दिसत आहेत, या बिर्याणी दौऱ्यात राहुल गांधींचा साधेपणा प्रत्येक गोष्टीत दिसून आला. 13 / 13 या टीमचा निरोप घेताना मी पुन्हा येईन, असेही राहुल गांधींनी म्हटलं. तसेच, येथे येऊन मला खूप आनंद वाटल्याचंही त्यांनी सांगितलं आणखी वाचा