Rahul Gandhi at University of California, Berkeley
अमेरिकेतील बर्कले युनिव्हर्सिटीमध्ये काय म्हणाले राहुल गांधी By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 4:08 PM1 / 7पक्षाने आदेश दिल्यास 2019च्या निवडणुकांमध्ये पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्यास मी तयार आहे.2 / 7संसद व मुख्य आर्थिक सल्लागारांना विचारात न घेता अंमलात आणलेल्या नोटाबंदी व जीएसटीसारख्या निर्णयांमुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड विपरीत परिणाम झाला आहे.3 / 7हिंसाचाराच्या घटना आता मुख्य प्रवाहाचा भाग झाल्या आहेत आणि हा प्रकार अतिशय भयंकर आहे. अहिंसेच्या विचारांवरच हल्ले सुरू आहेत. अहिंसेमुळेच मानवता जिवंत राहू शकते. मात्र त्याच विचारधारेला लक्ष्य केले जात आहे.4 / 7पीडीपीनं नवीन लोकांना राजकारणात आणण्याचं काम केले. मात्र भाजपासोबत युती झाल्यानंतर या गोष्टी बंद झाल्या. आता तिच युवापिढी दहशतवाद्यांकडे वळत आहे. भाजपानं स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी काश्मीरचं नुकसान केले आहे.5 / 7भाजपामधील काही जण केवळ कम्प्युटरसमोर बसून माझ्याविरोधात अजेंडा चालवत आहेत. मी मूर्ख आहे, मी असा आहे, मी तसा आहे, अशा पद्धतीनं माझ्याविरोधी ते अजेंडा राबवत आहेत.6 / 7भारतात बहुतांश राजकीय पक्षांमध्ये घराणेशाहीची समस्या आहे. यावरुन केवळ आमच्यावरच निशाणा साधण्यात येऊ नये. घराणेशाहीचं उदाहरण देताना त्यांनी अखिलेश यादव यांच्यासहीत अभिषेक बच्चन यांच्याही नावाचा उल्लेख केला.7 / 7नरेंद्र मोदी माझ्यापेक्षाही उत्तम वक्ते आहेत, गर्दीतील तीन ते चार वेगवेगळ्या गटांपर्यंत आपला संदेश कसा पोहोचवायचा हे मोदींना चांगलंच माहिती आहे. आपला संदेश पोहोचवण्याची त्यांची क्षमता प्रभावी आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications