शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार; 138 लोकांना NDRF ने एअरलिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2019 1:07 PM

1 / 7
गुजरातच्या काही जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. वडोदरामध्ये शाळा-कॉलेज बंद करण्यात आलेत. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पोलीस आणि एनडीआरएफ जवान तैनात आहेत.
2 / 7
NDRF च्या टीमने IAF C 130 या एअरक्राफ्टमधून 138 लोकांना वाचविले आहे. रात्री उशीरापर्यंत प्रशासनाकडून हे बचावकार्य सुरु होते. लोकांना वाचविण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे.
3 / 7
वडोदरामध्ये बुधवारपासून सुरु असलेल्या पावसामुळे अनेक नागरिकांना प्रशासनाकडून सुरक्षितस्थळी हलविलं आहे.
4 / 7
वडोदरासोबत अहमदाबादमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी भरलं आहे. पुरामुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
5 / 7
पूरग्रस्त भागात एनडीआरएफकडून मदतकार्य केलं जात आहे.
6 / 7
वडोदरामध्ये पुराच्या पाण्यात नागरी वस्तीत मगर आढळल्याने स्थानिकांमध्ये घबराट पसरली आहे. या मगरीने वस्तीत पुराच्या पाण्यात असणाऱ्या कुत्र्यावर झडप घातली पण कुत्रा थोडक्यात बचावला.
7 / 7
तसेच पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यासाठी पोलिसही सज्ज आहे. एक महिन्याच्या मुलीला पोलीस निरीक्षक जी. के चावडा यांनी डोक्यावर टोपली घेऊन खांद्यापर्यंतच्या पाण्यातून बाहेर काढले याचं कौतुकही होताना पाहायला मिळत आहे.
टॅग्स :RainपाऊसfloodपूरGujaratगुजरात