rajasthan chambal river new bride jumps in the river
उलटीचं कारण देत गाडीतून उतरली नववधू अन् केलं असं काही... By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 8:07 PM1 / 12राजस्थानच्या सवाई माधोपूर येथे लग्नाचा आनंद शोकसागरात बुडाला आहे. लग्न झाल्यानंतर सासरी निघालेल्या वधूनं चंबळ नदीच्या पुलावर गाडी थांबवली आणि नदीत उडी मारली. 2 / 12या घटनेनं वराकडच्या मंडळींनी आरडाओरडा केला. कोणालाही काहीही समजण्याच्या आतच तिनं पुलावरून नदीत उडी घेतली. 3 / 12त्याचदरम्यान गाडी चंबळ नदीच्या पुलावर आली, नववधून गाडीतून खाली उतरली आणि लोकांना काही समजण्याच्या आतच तिने पुलाच्या रेलिंगमधून नदीत उडी मारली. हे पाहून वराला व त्याच्या साथीदारांना धक्काच बसला. 4 / 12आरडाओरडा ऐकल्यानंतर स्थानिक लोक तेथे जमले होते. पोलीसही घटनास्थळी पोहोचले असून, स्थानिकांच्या मदतीनं वधूचा शोध घेतला जात आहे. 5 / 12बोटीतून काही स्थानिकही वधूचा नदीच शोध घेत आहेत. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, मुलीचे एक दिवस आधी लग्न झाले होते आणि लग्नाच्या काळात ती खूप आनंदी होती. 6 / 12लग्नात नववधू आपल्या पतीबरोबर आनंदच्या भरात नाचलीसुद्धा होती. ज्या पुलावरून महिलेने उडी मारली तो पूल राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील चंबळ नदीवर बांधलेला पूल आहे. 7 / 12त्यामुळे त्याला चंबळ पूल असेही म्हणतात. या घटनेची माहिती मिळताच राजस्थानच्या खंडार पोलीस ठाण्याचे आणि मध्य प्रदेशच्या समरसा चौकी पोलिसांचे पोलीसही घटनास्थळी पोहोचले आहेत आणि तपास सुरू केला आहे.8 / 12विशेष म्हणजे आदल्या दिवशी आनंदात असणाऱ्या मुलीनं असं का केलं असावं असा प्रश्नही आता पोलिसांना सतावतो आहे. 9 / 12मुलीकडची परिस्थिती अत्यंत गरीब आहे. लॉकडाऊनच्या काळातही अगदी साधेपणानं हे लग्न करण्यात आलं होतं. 10 / 12लग्नात नववधू वराबरोबर आनंदातही असल्याचंही तिच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.11 / 12पण मग त्या नववधूनं अचानक एवढं टोकाचं पाऊल का उचललं असावं, याचाच पोलीस आता तपास करत आहेत. 12 / 12पण मग त्या नववधूनं अचानक एवढं टोकाचं पाऊल का उचललं असावं, याचाच पोलीस आता तपास करत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications