CoronaVirus News: एका लग्नानं झोप उडवली; नवऱ्यासह ३७ जणांना कोरोना झाल्यानं एकच खळबळ By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 11:08 AM
1 / 10 देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. त्यातच लॉकडाऊनमध्ये लादण्यात आलेले निर्बंध अनलॉकमध्ये शिथिल करण्यात आल्यानं कोरोनाचा फैलाव अतिशय वेगानं होऊ लागला आहे. 2 / 10 राजस्थानमध्ये संपन्न झालेल्या एका लग्नानं प्रशासनाची झोप उडवली आहे. एकाच लग्नाला उपस्थित राहिलेल्या तब्बल ३७ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे. यामध्ये नवरदेवाचाही समावेश आहे. 3 / 10 २७ जूनला अजमेरमध्ये एक विवाह सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला उपस्थित असलेल्या ३७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या ३७ जणांमध्ये १३ जण पुष्कर, १८ जण बेवर, ५ जण बोरुंडा आणि १ जण अजमेरमधील आहे. 4 / 10 आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. 5 / 10 अजमेरमधील लग्नाला २०० हून जास्त पाहुणे उपस्थित होते. प्रशासनानं घालून दिलेले नियम धाब्यावर या लग्न सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. 6 / 10 लग्नाला आलेल्या ३७ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे. या लग्नाला उपस्थित राहिलेल्या इतर पाहुण्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. 7 / 10 लग्नात गाण्यासाठी निमंत्रित करण्यात आलेली महिलादेखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. 8 / 10 लग्नाला उपस्थित राहिलेल्या एका कुटुंबातील तब्बल १४ जणांना कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. 9 / 10 अजमेरमधील कँटोनमेंट गेट परिसरात हा लग्न सोहळा संपन्न झाला. यामध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचंदेखील उल्लंघन करण्यात आलं. 10 / 10 लग्न समारंभासाठी ५० पेक्षा जास्त अधिक जणांना उपस्थित राहता येणार नाही, असे आदेश राजस्थान सरकारनं ३ मे रोजी दिले आहेत. या नियमाचं उल्लंघन केल्यास १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येतो. मात्र या नियमाला अजमेरमधील विवाह सोहळ्यात हरताळ फासण्यात आला. आणखी वाचा