By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 19:36 IST
1 / 7प्रेमाला सीमा नसते याचा प्रत्यय अनेकदा पाहायला मिळतो. राजस्थानच्या जोधपूरमध्ये देखील हेच पाहायला मिळाले, जिथे आपले प्रेम मिळवण्यासाठी तरूणी सातासमुद्रापार भारतात आणि अन् राजस्थानात बिहारमधील तरूणाशी विवाहगाठ बांधली.2 / 7जोधपूरमधील उम्मेद भवन पॅलेस पुन्हा एकदा विदेशी वधू आणि स्थानिक तरूणाच्या शाही लग्नाचे साक्षीदार झाले. जोधपूरच्या उम्मेद पॅलेस आणि मेहरानगड किल्ल्यावर या जोडप्याचा विवाह झाला. या शाही विवाहासाठी मोठ्या संख्येने देशी-विदेशी पाहुणे जोधपूरला पोहोचले होते.3 / 7खरं तर बिहारमध्ये जन्मलेल्या सिद्धार्थ सिन्हाने हिंदू रितीरिवाजांनुसार अमेरिकन ओक्सानासोबत लग्नगाठ बांधली. आपले लग्न मोठ्या थाटामाटात व्हावे हे सिद्धार्थचे स्वप्न होते.4 / 7लग्न थाटामाटात करण्यासाठी सिद्धार्थने शाही विवाहांसाठी जगप्रसिद्ध असलेले राजस्थान निवडले. सिद्धार्थने जोधपूरच्या शाही महालात अमेरिकन तरूणीसोबत सातफेरे घेतले.5 / 7सिद्धार्थ आणि ओक्साना यांनी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले. जोधपूरच्या उम्मेद पॅलेसमध्ये झालेल्या या शाही विवाहासाठी अनेक मोठे विदेशी सेलिब्रिटी पोहोचले होते. यातील अनेक परदेशी मान्यवर पहिल्यांदाच भारतीय भूमीवर आले होते.6 / 7मूळचा बिहारचा असलेला सिद्धार्थ सिन्हा हा अमेरिकेत वास्तव्यास आहे. आपला विवाह थाटामाटात व्हावा यासाठी त्याने राजस्थान निवडले आणि उम्मेद भवन पॅलेस आणि मेहरानगडवर सातफेरे घेतले. 7 / 7मूळचा बिहारचा असलेला सिद्धार्थ सिन्हा हा अमेरिकेत वास्तव्यास आहे. आपला विवाह थाटामाटात व्हावा यासाठी त्याने राजस्थान निवडले आणि उम्मेद भवन पॅलेस आणि मेहरानगडवर सातफेरे घेतले.