Rajiv Gandhi Birth Anniversary - नवोदयची सुरुवात, PCO ची संकल्पना; राजीव गांधींचे 5 क्रांतीकारी निर्णय By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 10:58 AM
1 / 10 देशात दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी सद्भावना दिवस (Sadbhavan Diwas) साजरा केला जातो. माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांचा याच दिवशी जन्म झाला होता. भारताच्या इतिहासातील सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून त्यांची ओळख आहे. 2 / 10 त्यांनी वयाच्या 40 व्या वर्षी देशाची सूत्रे हाती घेतली. त्यांना एक दूरदर्शी नेता मानले गेले. आज त्यांचा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. 3 / 10 राजीव गांधी हे दूरदृ्ष्टी असणारे नेते होते, मात्र त्यांची हत्या करण्यात आल्याने त्यांचे अकाली निधन झाले. तरीही, आपल्या अल्प कारकिर्दीतही त्यांनी देशात अमुलाग्र बदल होईल, असे निर्णय घेतले. ज्या निर्णयामुळे राजीव गांधी अजरामर झाले आणि त्यांच्या या निर्णयामुळे देशातील ग्रामीण भागाच्या प्रगतीला गती मिळाली. 4 / 10 राजीव गांधी यांना संजय गांधींच्या अपघाती मृत्यूनंतर, 1980 साली त्यांना नाईलाजास्तव राजकारणात यावं लागलं. 1984 साली इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर ते देशाचे पंतप्रधान बनले. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 1984 साली लोकसभेच्या तीन-चतुर्थांश जागा जिंकल्या होत्या. त्यांनी वयाच्या 40 व्या वर्षी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. ते भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान होते. 5 / 10 प्रौढ मतदानाची वयोमर्यादा 18 वर आणली - भारतात अगोदर देशात मतदानासाठी वयाची 21 वर्षे पूर्ण असणं आवश्यक होतं. ही अट राजीव गांधींनी 18 वर आणली आणि लोकशाहीच्या प्रक्रियेत अधिक युवकांना सामिल करुन घेतलं. त्यामुळे, भारत हा तरुणाईचा देश बनण्यात मोठी मदत झाली. 6 / 10 राजीव गांधींनी आपल्या देशात तळागाळापर्यंत लोकशाही मुरण्यासाठी पंचायती राज व्यवस्था बळकट करण्यावर भर दिला. त्यांच्या कार्यकालातच पंचायत राज व्यवस्थेचा आराखडा तयार करण्यात आला होता. पण दुदैवाने त्यांचा लवकर मृत्यू झाला. पुढच्या सरकारने म्हणजे पंतप्रधान नरसिंह रावांनी 1992 मध्ये 73 आणि 74 वी घटनादुरुस्ती विधेयक पारित केलं आणि 24 एप्रिल 1993 पासून संपूर्ण देशात पंचायती राज व्यवस्था लागू केली. 7 / 10 डिजिटल क्रांतीचा पाया - आपला देश आज जी प्रगती करतोय किंवा देशात जी डिजिटल क्रांती झाली आहे त्याची पायाभरणी राजीव गांधीनी केली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वापराशिवाय देशाची प्रगती होणं शक्यच नाही असं त्यांचं मत होतं. देशात संगणकाची सुरुवात करण्याचा मान राजीव गांधींना जातोय. 8 / 10 नवोदयची सुरुवात - 1986 मध्ये जवाहर नवोदय विद्यालय प्रणाली नावाची एक केंद्र सरकार-आधारित संस्था देखील सुरू केली ज्यामुळे समाजातील ग्रामीण भागाच्या उत्थानासाठी त्यांना इयत्ता 6 ते 12 पर्यंत मोफत निवासी शिक्षण देण्यात येते. 9 / 10 पीसीओची सुरुवात - राजीव गांधींच्या प्रयत्नांमुळे, MTNL 1986 मध्ये सुरू करण्यात आली होती. ग्रामीण भागामध्ये दूरध्वनींची पोहोच वाढवण्यासाठी त्यांनी सार्वजनिक कॉल ऑफिस (PCOs) देखील तयार केले होते. 10 / 10 दरम्यान, 21 मे 1991 रोजी तामिळनाडूत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लिट्टे या श्रीलंकेतील दहशतवादी गटाने मानवी बॉम्बचा वापर करुन राजीव गांधींची हत्या केली. आणखी वाचा